Sunday, April 23, 2023

World Book Day - 23 April

 

Click here for image reference

जागतिक पुस्तक दिन व ई-माहितीसाधने

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. शेक्सपियर  या नामवंत इंग्रजी साहित्यिकाचा जन्मदिवस म्हणून जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे खास उद्दिष्ट आहे. यासाठी विविध ग्रंथालयातून वेगवेगळ्या वाचन स्पर्धेचे, तज्ञांकडून व्याख्यानाचे आयोजन करून पुस्तक व वाचनाविषयी आवड निर्माण करण्याचे कार्य केले जाते.

सध्याचे युग हे इंटरनेट चे युग म्हणून संबोधले जाते. आपणास हवी असलेली माहिती आपण इंटरनेटच्या मध्यतमातून एका क्लिक मध्ये काही सेकांदामध्ये पाहू शकतो ती डाउनलोड करून जातं करून ठेऊ शकतो. यासाठी वाचकांना आवश्यकता असते. इंटरनेट वर मोठय प्रमाणात मोफत स्वरुपात उपलब्ध  Online Educational Resources ची  माहिती वाचकाना व्हावी या उद्देशाने सदरील ब्लॉग पोस्ट  ची निर्मिती करण्यात येत आहे. 

सदरील ई-माहितीसाधनांचा वाचकांनी जास्तीत जास्त वापर करून Digital वाचन संस्कृती वाढवावी.  

 

व्रतामानपत्र - लोकनायक, दि. २३ एप्रिल २०२२ (संपादकीय) 

निवडक माहितीस्त्रोत 

जागतिक पुस्तक दिन

World Book Day: का साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन?

का साजरा होतो जागतिक पुस्तक दिन?

जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व काय आहे?जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो?

World Book Day


ई-माहितीसाधने

 DOAB https://www.doabooks.org/

DOAB हा पुस्तकांचा मेटाडेटा असून तो मोफत स्वरुपात सर्व  वाचकांसाठी वरील संकेतस्थळावर२४ तास उपलब्ध आहे. सदरील database हा प्रकाशकांचा वेबसाइटवरील प्रकाशनांच्या संपूर्ण मजकुराची थेट लिंक प्रदान करते. या database मध्ये  सर्व विषयांचा समावेश दिसून येत असला तरी यामध्ये मुख्येत्वे मानवता, कायदा आणि सामाजिक विज्ञानांवर लक्ष केंद्रित केले आहे.

2. Project Gutenberg : https://www.gutenberg.org/

Project Gutenberg हा ई बुक्स ची निर्मिती व वितरणासाठी चालना देणारा database आहे. सदरील database हा खप जुना असून त्याची निर्मिती १९७१ मध्ये अमेरेकेतील सुप्रसिद्ध लेखक Michael S. Hart यांनी केली. सदरील database हा https://www.gutenberg.org/ या संकेतस्थळावर विनामुल्य उपलबद्ध आहे. या database मधील बहुतेक संग्रह हा सार्वजनिक डोमेनमधील पुस्तके किंवा वैयक्तिक कथांचे संपूर्ण मजकूर आहेत.

3. मराठी ebooks : http://sahitya.marathi.gov.in/

राठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. यानुसार ज्ञानाचा हा अनमोल ठेवा असलेली मंडळाची ४४४ पुस्तके जशी आहेत त्या स्वरुपात मंडळाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहेत.

4. JSTOR : https://www.jstor.org/

William G. Bowen यांनी JSTOR ची १९९५ मध्ये  न्यूयॉर्क येथे केली. यामध्ये शैक्षणिक जर्नल्सचे डिजिटायझ्ड, बॅक इश्यू असलेले, त्यात आता पुस्तके आणि इतर प्राथमिक स्रोत तसेच सामाजिक विज्ञानातील जर्नल्सचे वर्तमान अंक समाविष्ट आहेत. सदरील database हा मोठ्या प्रमाणात संशोधकाकडून  जर्नल्स साठी वापरला जातो. 


INFLIBNET चा  Full form Information and Library Network असा आहे. हे एक स्वायत्त आंतरविद्यापीठीय केंद्र असून विद्यापीठ अनुदान आयोग (शिक्षण मंत्रालय , भारत सरकार) यांच्या अंतर्गत कार्यरत आहे.  INFLIBNET हे माहितीचा वापर  मोठ्या प्रमाणात होण्यासाठी व तसेच  संशोधन , अध्ययन व शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अविरत कार्य करीत असते. मुख्यत्वे संशोधन कार्याचे जतन, संवर्धन व प्रसारण सदरील संस्थेकडून केले जाते. सर्व शैक्षणिक भागधारकांना मोफत स्वरूपात माहिती देण्यासाठी सदरील संस्थेने खालील उपक्रम सुरु केले आहे. या उपक्रमातील माहिती आपण  मोफत स्वरूपात पेज टू पेज वाचू शकता , डाउनलोड करू शकता . सदरील उपक्रमातील माहिती हि अद्ययावत व विश्वसनीय स्वरूपाची असल्यामुळे संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी हे एक विश्वसनीय माहितीचे दालनच आहे. यामुळे सर्व वाचकांनी विशेषतः संशोधकांनी सदरील माहितीचा जास्तीत जास्त वापर करावा. 

5.1. Shodhganga - Home Page

संशोधकांसाठी shodhganga हि एक संजीवनी स्वरूपात कार्यरत आहे . संशोधकाला आपल्या संशोधन विषयावर उपलब्ध संशोधन थिसीस हे पेज टू पेज पाहता येतात . विशेषतः एका निर्देशामध्ये सदरील थिसीस उपलब्ध असल्यामुळे ते शोधण्यास सोपे आहे. विशिष्ट प्रकरणातील विशिष्ट माहिती कमीत कमी वेळात पाहता येते . भारतामधील जवळपास सर्व विद्यापीठे आपल्याकडील थिसीस हे शोधगंगा वर उपलब्ध करून ठेवत असल्यामुळे संशोधकांचा वेळ , श्रम व आर्थिक बचत होत आहे. सदरील संशोधन प्रकल्प हे संशोधकास विद्यापीठांनुसार , मार्गदशकानुसार , संशोधकांनुसार, विषयानुसार, विशिष्ट संकल्पनेनुसार पाहता येतात . सद्यपरिस्थितीत 327336 एवढा थिसीस चा संग्रह शोधगंगा संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   

5.2. Shodhganghotri - Home Page

शोधगंगोत्री हा उपक्रम नवीन संशोधकांसाठी संशोधनाचा विषय ठरवण्यासाठी अतिशय मार्गदर्शक आहे. शोधगंगोत्री संकेतस्थळावर भारतामधील संशोधकांचे संशोधन आराखडे , प्रकल्प आराखडे पाहता येतात व ते डाउनलोड करू शकतात . सदरील संशोधन आराखडे , संशोधन प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप हे संशोधकास विद्यापीठांनुसार , मार्गदशकानुसार , संशोधकांनुसार, विषयानुसार, विशिष्ट संकल्पनेनुसार पाहता येतात . 

5.3. Institutional Repository - Home Page

Institutional Repository या उपक्रमाद्वारे  INFLIBNET चा संस्थेतील प्रकाशाने वाचकांना उपलध करून दिली आहेत. यामध्ये वाचकांना INFLIBNET in Press and Media, InFLIBNET Conventin Proceedings  INFLIBNET Publications हि संस्थेची माहिती साधने Author, Subject व Date issued व च्या माध्यमातून पाहता येतात .  

5.4. INFOPORT - Home Page

INFOPORT   हा Indian Electronic Resource  चा  Subject Gateway असून यामध्ये वाचकांसाठी  भारतातील Online Scholarly Content उपलब्ध आहेत . यामध्ये वाचकांना वर्णानुक्रमे , दशांश वर्गीकरण तालिका संहितेनुसार माहितीच शोध घेता येतो . सदरील उपक्रमामध्ये खालील माहितीसाधेने आपणास पाहता येतात .


5.5 Research Project Database - Home Page

Research Project Database या उपक्रमाद्वारे INFLIBNET ने  संशोधनाचा database वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे .  UGC, ICMR, ICAR, DST व DBT या संस्थेने funded केलेल्या प्रोजेक्ट्स ची तपशीलवार माहिती सदरील database मध्ये उपलब्ध आहे. 


6. NDLI : https://ndl.iitkgp.ac.in/ 

     NDLI हे एक माहिती प्रतिप्राप्तीचे योग्य दालन होय. NDLI चा  Long-form आहे National Digital Library of India. NDLI हा Ministry of Education, Government of India अंतर्गत प्रकल्प असून ही एक Digital Repository आहे.सदरील प्रकल्पाचे कामकाज  IIT, Khargpur संस्थेअंतर्गत पाहिले जाते. सदरील प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा शैक्षणिक व संशोधनासाठी उपयुक्त अशी  ई - माहितीसाधने  मोफत स्वरूपात वाचकांना उपलब्ध करुण देणो हा आहे. 
   Home Page - https://ndl.iitkgp.ac.in/
आपणास होमपेजवर Search option दिसेल त्यावर क्लिक करून माहिती शोधता येते. कोरोना महामारीच्या काळात NDLI ने COVID-19 RESEARCH REPOSITORY ची सुविधा उपलब्ध केली आहे. कोरोना काळात वाचकांना घरी बसून सदरील इ - वाचनासाहित्याचा लाभ घेता येतो. होमपेजच्या डाव्या बाजूस Browse (माहितिचे वर्गीकरण ) व उजव्या बाजूस Login (NDLI वर लॉगिन होण्यासाठी)   हे  पोर्टल दिले आहे. 



Tuesday, April 11, 2023

Mahatma Phule related E-resources

 

महात्मा ज्योतिबा फुले


निवडक माहितीस्त्रोत 








निवडक ग्रंथ 





निवडक प्रबंध https://shodhganga.inflibnet.ac.in/












YouTube Video