Tuesday, November 30, 2021

करिअर कट्टा (सराव प्रश्नावली - नोव्हेंबर २०२१)

 


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी , अभ्यासकांना सूचित करण्यात येते कि, महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालया मार्फत सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा हि प्रत्येक महिन्यात एक वेळेस घेण्याचे आयोजिले आहेसदरील  परीक्षा हि ग्रंथालय ब्लॉग च्या माध्यमातून Google Form आधारे घेण्यात येईल. यामुळे हि परीक्षा अभ्यासकांना कोठेही इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे (संगणक , लॅपटॉप ,  मोबाईल इ. ) देता येईल. 


अभ्यासकांनी खालील लिंक ला क्लिक करून परीक्षा द्यावी 


https://forms.gle/Ugy7h3WvjXBYHTgg8


या उपक्रमाद्वारे आपणास स्पर्धा परीक्षेवरील online स्वरूपातील  वाचनसाहित्य उपलब्ध करून दिले जाईल . तसेच प्रत्येक महिन्यात ५० गुणांची  सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा Google  form च्या माध्यमातून घेतली जाईल. सदरील परीक्षा दिल्यानंतर View Result  मध्ये आपणास एकूण किती गुण मिळाले व अचूक उत्तरे कोणती आहेत हे समजून येईल. सदरील सराव सामान्य ज्ञान चाचणी परीक्षेमुळे आपणास स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत होईल. 


अभ्यासकांनी सदरील परीक्षेत आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवावा. व यासंदर्भात काही समस्या येत असतील अथवा आपली स्पर्धा परीक्षेसंदर्भात काही सूचना असतील,  वाचनसाहित्याची मागणी असेल तर कृपया आपली सदरील मागणी खालील ई-मेल वर पाठवावी . 

1. acscdlibrary20@gmail.com , 

2. librarian.acsckilledharur@gmail.com




MPSC Website संदर्भात माहिती 


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission ) ची वेबसाइट वरील माहिती योग्यरीत्या कशी पाहावी यासंदर्भात अभ्यासकांना खालील माहितीचा उपयोग होईल. 


प्रथमतः च्या होमपेज साठी खालील लिंक ला क्लिक करावे

https://mpsc.gov.in/


सदरील होमपेज खालील स्वरूपाचे दिसेल



सदरील होमपेज च्या वरील भागात खालीलपैकी महत्वाचे तीन पोर्टल दिसून येतील. 
1. About MPSC 2. Candidate Information 3. Online Facilities 


1. About MPSC मध्ये MPSC बद्दल , त्यांच्या वार्षिक अहवालाबाबत , Rules & Regulation , त्यांच्या बैठकाबाबत सविस्तर माहिती मिळते. 

 2. Candidate Information या पोर्टल मध्ये विविध पदाविषयी , परिवक्षेविषयी , जुन्या प्रश्नपत्रिकांविषयी माहिती मिळते.

3. Online Facilities -  विद्यार्थ्यांना Online Application , Mark sheet , Upload document याविषयी माहिती मिळते . सदरील पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांना लॉगिन करण्याची सुविधा उपलब्ध आहे .



सदरील होमपेज च्या मध्यभागात खालीलपैकी महत्वाचे तीन पोर्टल दिसून येतील. 



सदरील होमपेज च्या खालील भागात  इतर महत्वाच्या लिंक विषयी माहिती दिली आहे 











  

Thursday, November 25, 2021

करिअर कट्टा - YouTube Channel Subscribe करून आपला सहभाग नोंदवावा

 


(Image Reference - https://careerkatta.mitsc.co.in/)


महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग ,महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व श्री शाहू मंदिर महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा आयोजित


26 नोव्हेंबर 2021 रोजी संविधानाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त "संविधान दिन" मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे या उपक्रमांमध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे ही विनंती. सदर उपक्रमांमध्ये 


https://www.youtube.com/channel/UChvqVo1cE_PmXE19a4ye1gA


 वरील लिंक ला क्लिक केल्यास खालील YouTube Channel दिसेल 



वरील प्रमाणे Subscribe शब्दावर केल्यानंतर आपणास subscribed हा शब्द दिसेल व तसेच Subscription  added अशी सूचना दिसेल तेंव्हाच  आपला सहभाग नोंदविला जाईल.





या युट्युब चैनल वरून सकाळी 11.00 वाजता लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी खालील दोन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.


1. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याकडून 25 नोव्हेंबर पूर्वी सदर यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून घ्यावे.

2. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये स्वतःचे नाव व महाविद्यालयाचे नाव नोंदविणे अपेक्षित आहे. तरी आपणास विनंती अशी की भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संविधानाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे ही विनंती.



सदरील YouTube Channel  वरील Video पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करावे 

https://www.youtube.com/c/uvajagar/videos



सदरील YouTube Channel  वरील Playlist पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करावे 










Friday, November 19, 2021

मराठी ई-बुक डाउनलोड - CAS

 

(Reference -  https://marathi.gov.in/महाराष्ट्र-राज्य-साहित्य/ )

मराठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. 
 

सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते.  हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


वाचकांना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते . सदरील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती वाचकांना आपण सदरील ब्लॉगच्या माध्यमातून देत आहोत. 


या संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती प्रचलित जागरूकता सेवेच्या (Current Awarness Service ) माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रंथालयाद्वारे सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती करण्यात येत आहे . 


नोव्हेंबर  २०२१ - (New Post) 



ऑक्टोबर  २०२१ - (New Post) 









‘महाराष्ट्राचे शिल्पकार कृष्णराव पांडुरंग भालेकर’

Friday, November 12, 2021

Open Access Initiatives of INFLIBNET

 https://upload.wikimedia.org/wikipedia/en/6/6e/INFLIBNET_Centre_logo.png



वाचकांसाठी INFLIBNET चे मोफत उपक्रम 

INFLIBNET चा  Full form Information and Library Network असा आहे. हे एक स्वायत्त आंतरविद्यापीठीय केंद्र असून विद्यापीठ अनुदान आयोग (शिक्षण मंत्रालय , भारत सरकार) यांच्या अंतर्गत कार्यरत आहे.  INFLIBNET हे माहितीचा वापर  मोठ्या प्रमाणात होण्यासाठी व तसेच  संशोधन , अध्ययन व शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अविरत कार्य करीत असते. मुख्यत्वे संशोधन कार्याचे जतन, संवर्धन व प्रसारण सदरील संस्थेकडून केले जाते. 

सर्व शैक्षणिक भागधारकांना मोफत स्वरूपात माहिती देण्यासाठी सदरील संस्थेने खालील उपक्रम सुरु केले आहे. या उपक्रमातील माहिती आपण  मोफत स्वरूपात पेज टू पेज वाचू शकता , डाउनलोड करू शकता . सदरील उपक्रमातील माहिती हि अद्ययावत व विश्वसनीय स्वरूपाची असल्यामुळे संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी हे एक विश्वसनीय माहितीचे दालनच आहे. यामुळे सर्व वाचकांनी विशेषतः संशोधकांनी सदरील माहितीचा जास्तीत जास्त वापर करावा व या उपक्रमाची माहिती आपणास व्हावी या उद्देशाने सदरील ब्लॉगपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे .


INFLIBNET Website पाहण्यासाठीClick Here

Website address - https://www.inflibnet.ac.in/  


INFLIBNET चा  Homepage वर Major Activity - Open Access Initiatives मध्ये खालील उपक्रमाविषयी  माहिती दिली आहे. 






Open Access Initiatives


1. Shodhganga - Home Page

संशोधकांसाठी shodhganga हि एक संजीवनी स्वरूपात कार्यरत आहे . संशोधकाला आपल्या संशोधन विषयावर उपलब्ध संशोधन थिसीस हे पेज टू पेज पाहता येतात . विशेषतः एका निर्देशामध्ये सदरील थिसीस उपलब्ध असल्यामुळे ते शोधण्यास सोपे आहे. विशिष्ट प्रकरणातील विशिष्ट माहिती कमीत कमी वेळात पाहता येते . भारतामधील जवळपास सर्व विद्यापीठे आपल्याकडील थिसीस हे शोधगंगा वर उपलब्ध करून ठेवत असल्यामुळे संशोधकांचा वेळ , श्रम व आर्थिक बचत होत आहे. सदरील संशोधन प्रकल्प हे संशोधकास विद्यापीठांनुसार , मार्गदशकानुसार , संशोधकांनुसार, विषयानुसार, विशिष्ट संकल्पनेनुसार पाहता येतात . सद्यपरिस्थितीत 327336 एवढा थिसीस चा संग्रह शोधगंगा संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   




2. Shodhganghotri - Home Page

शोधगंगोत्री हा उपक्रम नवीन संशोधकांसाठी संशोधनाचा विषय ठरवण्यासाठी अतिशय मार्गदर्शक आहे. शोधगंगोत्री संकेतस्थळावर भारतामधील संशोधकांचे संशोधन आराखडे , प्रकल्प आराखडे पाहता येतात व ते डाउनलोड करू शकतात . सदरील संशोधन आराखडे , संशोधन प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप हे संशोधकास विद्यापीठांनुसार , मार्गदशकानुसार , संशोधकांनुसार, विषयानुसार, विशिष्ट संकल्पनेनुसार पाहता येतात . 




3. Institutional Repository - Home Page

Institutional Repository या उपक्रमाद्वारे  INFLIBNET चा संस्थेतील प्रकाशाने वाचकांना उपलध करून दिली आहेत. यामध्ये वाचकांना INFLIBNET in Press and Media, InFLIBNET Conventin Proceedings  INFLIBNET Publications हि संस्थेची माहिती साधने Author, Subject व Date issued व च्या माध्यमातून पाहता येतात .  


 



4. INFOPORT - Home Page

INFOPORT   हा Indian Electronic Resource  चा  Subject Gateway असून यामध्ये वाचकांसाठी  भारतातील Online Scholarly Content उपलब्ध आहेत . 


यामध्ये वाचकांना वर्णानुक्रमे , दशांश वर्गीकरण तालिका संहितेनुसार माहितीच शोध घेता येतो . सदरील उपक्रमामध्ये खालील माहितीसाधेने आपणास पाहता येतात .


5. Research Project Database - Home Page

Research Project Database या उपक्रमाद्वारे INFLIBNET ने  संशोधनाचा database वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे .  UGC, ICMR, ICAR, DST व DBT या संस्थेने funded केलेल्या प्रोजेक्ट्स ची तपशीलवार माहिती सदरील database मध्ये उपलब्ध आहे. 






वाचकांनी INFLIBNET च्या सर्व Open Access Initiatives चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा !


Thursday, November 4, 2021

दिवाळी अंक - सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

(http://arti-katha.blogspot.com/2017/10/diwali-wishes-wallpaper-and-quotes.html)



वाचकांना दिवाळी अंक म्हंटल कि एक पर्वणीच ! पूर्वीच्या काळी दिवाळीत वाचक हे आपले बौद्धिक गरज , मनोरंजन इ. साठी  दिवाळी अंक खूप आवडीने वाचले जायचे . परंतु आजच्या डिजिटल युगात त्यांचे महत्व  या इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे कमी जरी वाटत असले तरी सदरील  दिवाळी अंक हे आपल्या समाजातील भाषा, संस्कृती जपण्याचे अविरत कार्य करीत आहेत. आजच्या कोरोना महामारीच्या काळात व माहितीतंत्रज्ञानाच्या युगात  दिवाळी अंकांनी आपले पारंपरिक स्वरूप बदलून डिजिटल स्वरूप अवलंबले आहे. यामुळे दिवाळी अंक हे आपण PDF स्वरूपात आपल्या घरी बसून मोबाईल वर वाचू शकता . वाचकांना  दिवाळी अंकाविषयी माहिती व जुने दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध करून द्यावीत या उद्देशाने सदरील ब्लॉगपोस्ट ची इनर्मिती करण्यात येत आहे . व तसेच सर्व वाचकांना हि दिवाळी ज्ञानसमृद्धी , उन्नत्ती  व भरभराटीची जावो हीच प्रार्थना! 

दिवाळी अंकाविषयी निवडक माहिती 










 जुने दिवाळी अंक वाचनासाठी भेट 










सर्व वाचकास पुनश्च दिवाळीच्या ज्ञानरूपी प्रकाशमय खूप खूप शुभेच्छा