(Reference - https://images.app.goo.gl/kFPHCjcxqFZDWYPS8)
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी
(अकरावी व बारावी वर्ग) (
सदरील संकेतस्थळ हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यासाठीचे शासनमान्य संकेतस्थळ आहे. या संकेत स्थळावर आपणास महाराष्ट्र शासनाचे नोटिफिकेशन प्रकाशने डिव्हिजनल लेटेस्ट नोटिफिकेशन इत्यादी सर्वांगीण माहिती पाहायला मिळते. या संकेतस्थळावरील माहिती अकरावी आणि बारावी विद्यार्थ्यांना विश्वसनीय स्वरूपात माहिती पुरवीत असते.
महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावरील सदरील पोर्टलवर विषय निहाय अभ्यासक्रम पाहता येतो ,तो डाउनलोड करता येतो. तसेच बालभारती एन सी आर टी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र पोर्टल इत्यादी संकेतस्थळावर क्विक लिंक्स च्या माध्यमातून जाता येते.
सदर संकेतस्थळावर आपणास बालभारतीची प्रकाशने पाहायला मिळतात. इयत्ता पहिली पासून ते बारावी वर्गासाठी चे सर्व पुस्तके पीडीएफ स्वरुपात या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून आपल्या मोबाईल मध्येच पुस्तके वाचण्याची मुभा या संकेतस्थळामुळे प्राप्त झाली आहे. सदरील संकेतस्थळावर क्लासेस या पोर्टल मध्ये वर्गानुसार पुस्तकांचे वर्गीकरण केलेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गानुसार पुस्तके पाहण्याची येथे मुभा दिलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर येईल शिक्षण संक्रमण या पोर्टल वर शिक्षण संक्रमण हे मासिक पाहायला मिळते. सदरील पोर्टलवर वर्षानुसार ई-मासिक पाहायला मिळते सचिन ते डाऊनलोड करता येते. सदरील मासिकातून क्षेत्राशी संबंधित लेख व माहिती सुधारित अभ्यासक्रम, अभ्यासक्रमातील बदल, अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती, परीक्षा पद्धती, परिपत्रक, शासन निर्णय इत्यादी प्रसिद्ध केले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना सर्व घटकांचे अद्यावत माहिती मिळते.
या संकेस्थळावर विज्ञान शाखेशी निगडित संबंधित विषयावरील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते. सदर संकेतस्थळावर Learners, Teachers, Parents या तीन पोर्टलच्या माध्यमातून सहभागी होता येते. एखाद्या विषयावरील विशिष्ट संकल्पनेचे माहिती सविस्तर पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत असल्याने ते समजण्यास सोपे जाते. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सदरील संकेतस्थळ हे पर्वणीच आहे. आपणास एखादी संकल्पना समजत नसेल तर त्या संकल्पनेचे व्हिडीओज संकेतस्थळावर पाहायला मिळते. विज्ञान शाखेची सोबतच सद्यस्थितीत मानव विद्याशाखा तसेच अर्थशास्त्राची संबंधित व्हिडिओज विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात.
वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी
(पदवी वर्ग - बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.)
सदर संकेतस्थळ हे विद्यापीठाचे संकेतस्थळ असून यावर विद्यार्थ्यास विद्यापीठाची संबंधित सर्व माहिती विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया पासून - निकालापर्यंत ची सर्व माहिती सदर संकेतस्थळावर पहावयास मिळते. ज्यामध्ये विद्यार्थ्यासाठी विशेषतः प्रवेश, परीक्षा, पदवीदान अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती, शैक्षणिक दिनदर्शिका, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास केंद्र, क्रीडा विभाग, ज्ञानू स्त्रोत केंद्र ग्रंथालय, प्रशिक्षण व सेवायोजन कक्ष, विद्यापीठाचे वार्षिक अहवाल, विद्यार्थी वस्तीग्रह, स्वयम् ,राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी, डिजिलॉकर, इत्यादी माहिती मिळते.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील अभ्यासक्रम पोर्टल वर सर्व विषयांचे अभ्यासक्रम पाहता येतात, ते डाऊनलोड करता येतात. सदरील अभ्यासक्रमाची रचना सुधारित अभ्यासक्रमानुसार वर्षनिहाय केलेली दिसून येते. आपणास हव्या असलेल्या विषयावरील अभ्यासक्रम पाहण्याची मुभा सदरील पोर्टलवर उपलब्ध आहे.
सदर संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येते. यासंदर्भातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील मार्गदर्शक सूचना पाहून विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करू शकतात. यामध्ये दोन प्रकारे आपला प्रवेश निश्चित केला जातो. प्रथम - ऑनलाईन आपलिकेशन प्रोसेस फॉर स्टुडन्ट येथे क्लिक करून विद्यापीठातील प्रथम वर्गा साठी व व द्वितीय प्रकारात ऑनलाइन एप्लीकेशन प्रोसेस फोर रजिस्टर स्टुडन्ट येथे क्लिक करून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्गासाठी चा प्रवेश निश्चित करता येतो. यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसूनच आपला प्रवेश निश्चित करता येतो.
सदरील संकेतस्थळावरून विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देऊ शकतात. विद्यापीठाने कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही परीक्षा पद्धतीचा अवलंब केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपात द्यावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांनी सदरील संकेतस्थळावर जाऊन आपली ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये लॉगिन करीत असताना विद्यार्थ्याचे युजरनेम हे विद्यार्थ्याचा पी आर एन नंबर आहे व पासवर्ड ही विद्यार्थ्यांची जन्मतारीख आहे. सदरील ऑनलाइन परीक्षेचे पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थी आपल्या मोबाईल, लॅपटॉप, संगणकावर परीक्षा देऊ शकतात.
सदरील संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन एक परीक्षा देता येते. ऑनलाईन परीक्षेसाठी लॉगिन करीत असताना विद्यार्थ्यांनी त्यांचा पी आर एन नंबर आणि जन्मतारीख माहिती असणे गरजेचे आहे कारण पी आर एन नंबर व जन्मतारीख चा वापर लोगिन करताना होतो. सदर संकेतस्थळावर डाव्या बाजूस लॉगिन करता येते व उजव्या बाजूस विद्यापीठाने सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे तंतोतंत पालन करून विद्यार्थ्यास ऑनलाइन परीक्षा देता येते.
प्राध्यापक, संशोधक व इतर वाचकांसाठी
(Academic Stakeholders)
सदरील संकेतस्थळावर आपणास बहुतांश मराठी वर्तमानपत्रांचे वाचन करता येते. आपणास हव्या असलेल्या वर्तमानपत्रावर क्लिक करुन वर्तमानपत्र वाचता येते.
सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते. हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या संकेत स्थळावर आपणास मराठी विश्व कोश ही स्वरूपात उपलब्ध मिळेल. या संकेतस्थळामुळे वाचकांना घरी बसून विश्वकोश पाहता येतो तसेच मराठी विश्वकोश हा मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही आपणाला डाऊनलोड करता येतो. या संकेतस्थळामुळे वाचकांना घरी बसूनच विश्वकोश वाचण्याची मुभा निर्माण झालेली आहे.
या संकेत स्थळावर आपणास सर्व विषयातील शोध प्रबंध ई स्वरूपात पाहावयास मिळतात. या संकेत स्थळावर जवळपास तीन लाखापेक्षा जास्त शोधप्रबंध उपलब्ध आहेत तसेच 476 विद्यापीठाने आपले शोध प्रबंध स्वरुपात या संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहेत.भारतातील जवळपास सर्व विद्यापीठाने यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. सदरील संकेतस्थळ हे संशोधनासाठी एक सुवर्ण मध्येच आहे. यामध्ये संशोधक हा एखादा शोधप्रबंध पेज टू पेज पाहू शकतो, सेव करू शकतो व त्याची प्रिंट काढू शकतो. यामुळे संशोधकाला संशोधन विषयाशी निगडित मोठ्या प्रमाणात माहिती मिळते व एकाच विषयावरील संशोधनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मदत होते.
शोध गंगोत्री संकेतस्थळावर संशोधकाला संशोधनाचा आराखडा पाहावयास मिळतो. सद्यस्थितीत कोणत्या विषयावर संशोधन चालू आहे या विषयाची माहिती या संकेतस्थळावर पाहायला मिळते. यामुळे संशोधकांना संशोधन विषय निवडत असताना सदरील संकेतस्थळाचा खूप फायदा होतो.
सदर संकेतस्थळ वाचकांना विद्यापीठ अनुदान आयोगाची संबंधित अद्यावत माहिती देते. सदरील संकेतस्थळावर यूजीसीच्या योजना स्कॉलरशिप, फेलोशिप, स्टुडन्ट कॉर्नर ,फॅकल्टी कॉर्नर संबंधीची अद्यावत माहिती पुरविते. प्राध्यापक व संशोधकांना मेजर व मायनर संशोधनाविषयी माहिती देते तसेच यूजीसी अॅप्रोवेड जर्णल च्या माध्यमातून यूजीसीने मान्यता प्राप्त केलेल्या जर्नल ची आद्यवत यादी देते.
सदर संकेतस्थळावर वाचकांना मोठ्या प्रमाणात ई- स्वरूपात माहिती देण्याचे कार्य नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया हे करीत असते. यामध्ये जवळपास सर्व विषयावर ऑनलाइन स्वरूपात माहिती उपलब्ध आहे. यासाठी वाचकाने सदरील संकेतस्थळावर आपले खाते उघडणे आवश्यक आहे. वाचक जीमेल च्या माध्यमातून लॉगिन करू शकतात. एखादी संकल्पना सदरील संकेतस्थळावरील सर्च बार मध्ये टाकलं नंतर आपणास या संकल्पनेशी निगडित शेकडो अशी माहिती ई- स्वरूपात पाहावयास मिळते. सदर माहिती ही टेक्स्ट, ऑडिओ आणि ऑडिओ-व्हिज्युअल फॉरमॅटमध्ये पाहता येते.
स्वयम् च्या माध्यमातून आपणास घरी बसून ऑनलाईन कोर्स करता येतात. आपण सदरील संकेतस्थळावर लॉगिन असणे आवश्यक आहे. आपणास आवश्यक असणाऱ्या कोर्सला लॉगिन झाल्यानंतर त्या कोर्सची संबंधित माहिती आपणाला टेक्स्ट, आणि ऑडिओ-व्हिज्युअल फॉरमॅटमध्ये पुरवली जाते. सदरील माहितीच्या आधारे आपणाकडून असाइन्मेंट कंप्लिट केली जातात. आपले असाइन्मेंट आणि अंतिम परीक्षा गुण लक्षात घेऊन आपला निकाल जाहीर केला जातो. यामध्ये आय आय टी. एन आय टी इत्यादी मधील तज्ञ प्राध्यापकांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ आपणास या कोर्समध्ये घेता येतो. यामुळे संशोधक प्राध्यापक व इतर वाचकांसाठी घरी बसून एखादा कोर्स पूर्ण करण्यासाठी सुवर्णसंधी लाभली आहे.
https://gopaldsagar.blogspot.com/2021/03/blog-post.html
सदरील संकेतस्थळे वापरासंदर्भात समस्या निर्माण झाल्यास खालील इमेल आयडीवर आपली समस्या पाठविण्यात यावी. ई-मेलच्या माध्यमातून सदरील समस्येचे निराकरण केले जाईल.
acscdlibrary20@gmail.com
librarian.acsckilledharur@gmail.com