Saturday, June 26, 2021

26 जून - राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

                                                   

   

(Reference - https://indiavistar.com/history-of-chhatarpati-sahu-maharaj-ji/)

छत्रपती राजर्षी शाहू महाराज 

जन्म 26 जून 1874 - मृत्यू 6 मे 1922


||जयंती निमित्त विनम्र अभिवादन||


राजर्षी  छत्रपती शाहू महाराज - निवडक माहिती स्त्रोत

निवडक संकेतस्थळे (Websites)

छत्रपती शाहू महाराज - विकिपीडिया 

छत्रपती शाहू महाराज - Shivray.com

शाहूजी महाराज: जिन्होंने 1902 में आरक्षण लागू किया - bbc.com 

कोल्हापूर के शाहू - मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से 

पिछड़ों-दलितों के मुक्तिदाता राजा : शाहू जी महाराज - forwardpress.in 

छत्रपती शाहू महाराज - vikaspedia.in 


निवडक ग्रंथ 

श्रीमनछत्रपती शाहूमहाराज यांचे चरित्र

क्रांतिसुक्ते राजेर्षी छत्रपती शाहू 


निवडक  प्रबंध

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान 

राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा समाजशास्त्रीय अभ्यास

राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि ब्राह्मणेतर चळवळ एक चिकित्सक अभ्यास 1874 ते 1922

राजर्षी शाहू महाराजांचे आरक्षण धोरण व प्रचलित आरक्षण धोरण एक चिकित्सक अभ्यास

Shahu Chhatrapati of Kolhapur: A social revolutionary 1874-1922


निवडक YouTube - Video

कोण होते लोकराजा छत्रपती शाहू महाराज?

छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य व जीवनचरित्र 

छत्रपती शाहू महाराज संपूर्ण इतिहास 

कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास | Histroy of Shahu maharaj

Chhatrapati Shahu Maharaj Biography in Hindi | Motivational Video

Rajarshi Shahu Maharaj||UPSC/MPSC/STI/PSI/ASO/Talathi and others Exams

राजर्षी शाहू महाराज सखोल माहिती


Monday, June 21, 2021

२१ जून - योग दिवस

(Reference - https://swatvasamachar.com/bihar-update/21-june-ko-kyo-manate-yog/ )


 निवडक संकेतस्थळे (Websites)

अंतर्राष्ट्रीय योग दिवस - मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया

इस वजह से 21 जून को मनाया जाता है योग दिवस - theruralpress.in

International Yoga Day 2021: Theme, benefits of Yoga - indiatvnews.com

International Day of Yoga - Wikipedia

21 जून विश्व योग दिवस : क्यों मनाया जाता है? hindi.webdunia.com

योगासन - fizikamind.in

योगासन केल्यामुळे होतं आरोग्य निरोगी - marathi.popxo.com

मानवी जीवनात योगाचे महत्त्व - marathi.webdunia.com

योगासने आणि फायदे - esakal.com

योगचिकित्सा (Yoga therapy) - marathivishwakosh.org


निवडक ग्रंथ 

yoga Hindi PDF Books in Download - 44books.com

ध्यान - योग - अज्ञात - ia801600.us.archive.org

Yoga (Marathi) - BookGanga

योग प्रवाह - https://ia801603.us.archive.org

योग और शिक्षा - https://ia801600.us.archive.org


निवडक  प्रबंध  (https://shodhganga.inflibnet.ac.in/)

पतंजलि योग दर्शन में कर्मा सिद्धांत: एक अध्ययन

योग दर्शन में क्लेश

पतंजलि और चरणदास का अष्टांग योग: एक तुलनात्मक अध्ययन

प्रमुख पुरानो मे योग

सांख्य योग मे प्रमाणमीमांसा

संत साहित्य मे योग साधना

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या योग्य विचारांचे चिकित्सक अभ्यास



निवडक YouTube - Video

Thursday, June 10, 2021

19 जून - वाचन दिन कार्यक्रम



  अध्यक्ष –  प्राचार्य डॉ. एस. झेड. शिरसाठ       
  

प्रमुख व्याख्याते - डॉ. डी. टी. घटकार
   
 
प्रास्ताविक -  प्राजीडी. सगर    
   
सूत्रसंचालन -  डॉ. एन बी. कुंभार   
 भार – प्रा. ए. आर. गाडे

                                            
वाचन दिन कार्यक्रम सोहळ्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग 
पाहण्यासाठी Click Here येथे क्लिक करावे 



Shivdas Shirsath is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: वाचन दिन
Time: Jun 19, 2021 11:00 AM India

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86227992407?pwd=VHd3dld1bnhJYkc2amZ0OXcwQlR1UT09 

Meeting ID: 862 2799 2407
Passcode: 946718

वाचन दिन  - 19 जून 2021

19 जुन वाचन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालय ग्रंथालयाने ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांसाठी उपयुक्त अशी मोफत ई - रिसोर्सेस विषयी माहिती देत आहोत.


कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 
(अकरावी व बारावी वर्ग)  (

सदरील संकेतस्थळ हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यासाठीचे शासनमान्य संकेतस्थळ आहे. या संकेत स्थळावर आपणास महाराष्ट्र शासनाचे नोटिफिकेशन प्रकाशने डिव्हिजनल लेटेस्ट नोटिफिकेशन इत्यादी सर्वांगीण माहिती पाहायला मिळते. या संकेतस्थळावरील माहिती अकरावी आणि बारावी विद्यार्थ्यांना विश्वसनीय स्वरूपात माहिती पुरवीत असते.

महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावरील सदरील पोर्टलवर विषय निहाय अभ्यासक्रम पाहता येतो ,तो डाउनलोड करता येतो. तसेच बालभारती एन सी आर टी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र पोर्टल इत्यादी संकेतस्थळावर क्विक लिंक्स च्या माध्यमातून जाता येते. 

सदर संकेतस्थळावर आपणास बालभारतीची प्रकाशने पाहायला मिळतात. इयत्ता पहिली पासून ते बारावी वर्गासाठी चे सर्व पुस्तके पीडीएफ स्वरुपात या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून आपल्या मोबाईल मध्येच पुस्तके वाचण्याची मुभा या संकेतस्थळामुळे प्राप्त झाली आहे. सदरील संकेतस्थळावर क्लासेस या पोर्टल मध्ये वर्गानुसार पुस्तकांचे वर्गीकरण केलेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गानुसार पुस्तके पाहण्याची येथे मुभा दिलेली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर येईल शिक्षण संक्रमण या पोर्टल वर शिक्षण संक्रमण हे मासिक पाहायला मिळते. सदरील पोर्टलवर वर्षानुसार ई-मासिक पाहायला मिळते सचिन ते डाऊनलोड करता येते. सदरील मासिकातून क्षेत्राशी संबंधित लेख व माहिती सुधारित अभ्यासक्रम, अभ्यासक्रमातील बदल, अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती, परीक्षा पद्धती, परिपत्रक, शासन निर्णय इत्यादी प्रसिद्ध केले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना सर्व घटकांचे अद्यावत माहिती मिळते.

या संकेस्थळावर विज्ञान शाखेशी निगडित संबंधित विषयावरील तज्ञ  मार्गदर्शकांचे मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते. सदर संकेतस्थळावर Learners, Teachers, Parents या तीन पोर्टलच्या माध्यमातून सहभागी होता येते. एखाद्या विषयावरील विशिष्ट संकल्पनेचे माहिती  सविस्तर पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत असल्याने  ते समजण्यास सोपे जाते. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सदरील संकेतस्थळ हे पर्वणीच आहे. आपणास एखादी संकल्पना समजत नसेल तर त्या संकल्पनेचे व्हिडीओज संकेतस्थळावर पाहायला मिळते. विज्ञान शाखेची सोबतच सद्यस्थितीत मानव विद्याशाखा तसेच अर्थशास्त्राची संबंधित व्हिडिओज विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात.

वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 
(पदवी वर्ग -  बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.)

सदर संकेतस्थळ हे विद्यापीठाचे संकेतस्थळ असून यावर विद्यार्थ्यास विद्यापीठाची संबंधित सर्व माहिती विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया  पासून - निकालापर्यंत ची सर्व माहिती सदर संकेतस्थळावर पहावयास मिळते. ज्यामध्ये विद्यार्थ्यासाठी विशेषतः प्रवेश, परीक्षा, पदवीदान अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती, शैक्षणिक दिनदर्शिका, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास केंद्र, क्रीडा विभाग, ज्ञानू स्त्रोत केंद्र ग्रंथालय, प्रशिक्षण व सेवायोजन कक्ष,  विद्यापीठाचे वार्षिक अहवाल, विद्यार्थी वस्तीग्रह, स्वयम् ,राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी, डिजिलॉकर, इत्यादी माहिती मिळते.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील अभ्यासक्रम पोर्टल वर सर्व विषयांचे अभ्यासक्रम पाहता येतात, ते डाऊनलोड करता येतात. सदरील अभ्यासक्रमाची रचना सुधारित अभ्यासक्रमानुसार  वर्षनिहाय केलेली दिसून येते. आपणास हव्या असलेल्या विषयावरील अभ्यासक्रम पाहण्याची मुभा सदरील पोर्टलवर उपलब्ध आहे.

सदर संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येते. यासंदर्भातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील मार्गदर्शक सूचना पाहून विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करू शकतात. यामध्ये दोन प्रकारे आपला प्रवेश निश्चित केला जातो. प्रथम - ऑनलाईन आपलिकेशन प्रोसेस फॉर स्टुडन्ट येथे क्लिक करून विद्यापीठातील प्रथम वर्गा साठी व व द्वितीय प्रकारात ऑनलाइन एप्लीकेशन प्रोसेस फोर रजिस्टर स्टुडन्ट येथे क्लिक करून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्गासाठी चा प्रवेश निश्चित करता येतो. यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसूनच आपला प्रवेश निश्चित करता येतो.

सदरील संकेतस्थळावरून विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देऊ शकतात. विद्यापीठाने कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही परीक्षा पद्धतीचा अवलंब केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपात द्यावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांनी सदरील संकेतस्थळावर जाऊन आपली ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये लॉगिन करीत असताना विद्यार्थ्याचे युजरनेम हे विद्यार्थ्याचा पी आर एन नंबर आहे व पासवर्ड ही विद्यार्थ्यांची जन्मतारीख आहे. सदरील ऑनलाइन परीक्षेचे पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थी आपल्या मोबाईल, लॅपटॉप, संगणकावर परीक्षा देऊ शकतात.

सदरील संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन एक परीक्षा देता येते. ऑनलाईन परीक्षेसाठी लॉगिन करीत असताना विद्यार्थ्यांनी त्यांचा पी आर एन नंबर आणि जन्मतारीख माहिती असणे गरजेचे आहे कारण पी आर एन नंबर व जन्मतारीख चा वापर लोगिन करताना होतो. सदर संकेतस्थळावर डाव्या बाजूस लॉगिन करता येते व उजव्या बाजूस विद्यापीठाने  सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे तंतोतंत पालन करून विद्यार्थ्यास ऑनलाइन परीक्षा देता येते.

प्राध्यापक, संशोधक व इतर वाचकांसाठी

(Academic Stakeholders)


सदरील संकेतस्थळावर आपणास बहुतांश मराठी वर्तमानपत्रांचे वाचन करता येते. आपणास हव्या असलेल्या वर्तमानपत्रावर क्लिक करुन वर्तमानपत्र वाचता येते.

सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते.  हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या संकेत स्थळावर आपणास मराठी विश्व कोश ही स्वरूपात उपलब्ध मिळेल. या संकेतस्थळामुळे वाचकांना घरी बसून विश्वकोश पाहता येतो तसेच मराठी विश्वकोश हा मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही आपणाला डाऊनलोड करता येतो. या संकेतस्थळामुळे वाचकांना घरी बसूनच विश्वकोश वाचण्याची मुभा निर्माण झालेली आहे.

या संकेत स्थळावर आपणास सर्व विषयातील शोध प्रबंध ई स्वरूपात पाहावयास मिळतात. या संकेत स्थळावर जवळपास तीन लाखापेक्षा जास्त शोधप्रबंध उपलब्ध आहेत तसेच 476 विद्यापीठाने आपले शोध प्रबंध स्वरुपात या संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहेत.भारतातील जवळपास सर्व विद्यापीठाने यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. सदरील संकेतस्थळ हे संशोधनासाठी एक सुवर्ण मध्येच आहे. यामध्ये संशोधक हा एखादा शोधप्रबंध पेज टू पेज पाहू शकतो, सेव करू शकतो व त्याची प्रिंट काढू शकतो. यामुळे संशोधकाला संशोधन विषयाशी निगडित मोठ्या प्रमाणात माहिती मिळते व एकाच विषयावरील संशोधनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मदत होते. 

शोध गंगोत्री संकेतस्थळावर संशोधकाला संशोधनाचा आराखडा पाहावयास मिळतो. सद्यस्थितीत कोणत्या विषयावर संशोधन चालू आहे या विषयाची माहिती या संकेतस्थळावर पाहायला मिळते. यामुळे संशोधकांना संशोधन विषय निवडत असताना सदरील संकेतस्थळाचा खूप फायदा होतो.

UGC 
सदर संकेतस्थळ वाचकांना विद्यापीठ अनुदान आयोगाची संबंधित अद्यावत माहिती देते. सदरील संकेतस्थळावर यूजीसीच्या योजना स्कॉलरशिप, फेलोशिप, स्टुडन्ट कॉर्नर ,फॅकल्टी कॉर्नर  संबंधीची अद्यावत माहिती पुरविते. प्राध्यापक व संशोधकांना मेजर व मायनर संशोधनाविषयी माहिती देते तसेच यूजीसी अॅप्रोवेड जर्णल च्या माध्यमातून यूजीसीने मान्यता प्राप्त केलेल्या जर्नल ची आद्यवत यादी  देते.

सदर संकेतस्थळावर वाचकांना मोठ्या प्रमाणात ई- स्वरूपात माहिती देण्याचे कार्य नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया हे करीत असते. यामध्ये जवळपास सर्व विषयावर ऑनलाइन स्वरूपात माहिती उपलब्ध आहे. यासाठी वाचकाने सदरील संकेतस्थळावर आपले खाते उघडणे आवश्यक आहे. वाचक जीमेल च्या माध्यमातून लॉगिन करू शकतात. एखादी संकल्पना सदरील संकेतस्थळावरील सर्च बार मध्ये टाकलं नंतर आपणास या संकल्पनेशी निगडित शेकडो अशी माहिती ई- स्वरूपात पाहावयास मिळते. सदर माहिती ही टेक्स्ट, ऑडिओ आणि ऑडिओ-व्हिज्युअल फॉरमॅटमध्ये पाहता येते.

स्वयम् च्या माध्यमातून आपणास घरी बसून ऑनलाईन कोर्स करता येतात. आपण सदरील संकेतस्थळावर लॉगिन असणे आवश्यक आहे. आपणास आवश्यक असणाऱ्या कोर्सला लॉगिन झाल्यानंतर  त्या कोर्सची संबंधित माहिती आपणाला टेक्स्ट, आणि ऑडिओ-व्हिज्युअल फॉरमॅटमध्ये पुरवली जाते. सदरील माहितीच्या आधारे आपणाकडून असाइन्मेंट कंप्लिट केली जातात. आपले असाइन्मेंट आणि अंतिम परीक्षा गुण लक्षात घेऊन आपला निकाल जाहीर केला जातो. यामध्ये आय आय टी. एन आय टी इत्यादी मधील तज्ञ प्राध्यापकांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ आपणास या कोर्समध्ये घेता येतो. यामुळे संशोधक प्राध्यापक व इतर वाचकांसाठी घरी बसून एखादा कोर्स पूर्ण करण्यासाठी सुवर्णसंधी लाभली आहे.

https://gopaldsagar.blogspot.com/2021/03/blog-post.html

सदरील संकेतस्थळे वापरासंदर्भात समस्या निर्माण झाल्यास खालील इमेल आयडीवर आपली समस्या पाठविण्यात यावी. ई-मेलच्या माध्यमातून सदरील समस्येचे निराकरण केले जाईल.

acscdlibrary20@gmail.com  
librarian.acsckilledharur@gmail.com 




सूचना 

दिनांक 10 जून2021

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्लेधारुर, ग्रंथालय व माहिती केंद्राद्वारे दिनांक 19 जून 2021 हा दिवस वाचन दिन म्हणून साजरा करण्यासाठी "वाचन दिन" स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सदरील स्पर्धेचे आयोजन केलेले आहे यामुळे महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे. सहभागी  स्पर्धकांनी खालील सूचनांचे पालन करावे.

सूचना  

  • स्पर्धक हा महाविद्यालयाचा विद्यार्थी असावा.
  •  "मला आवडलेला ग्रंथ" या विषयावर एखाद्या ग्रंथाचे समीक्षात्मक विवरण स्वतःच्या भाषेत मांडावे.
  •   कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्पर्धकांनी आपले लेख समीक्षा फक्त ईमेल आयडी वरच पाठवावीत.
  • सदरील लिखाण कार्याचे फोटोकॉपी अथवा पीडीएफ स्वरूपात या acscdlibrary20@gmail.com ई-मेल आयडी वर दिनांक 17 जून 2021 पर्यंत पाठवावे. 

स्पर्धेतील सर्व समीक्षा परीक्षकांकडून तपासणी करून उत्कृष्ट  वाचकाचा  ग्रंथ भेट स्वरूपात पारितोषिक वितरण सोहळा 19 जून 2021 रोजी वितरीत केला जाईल .

अधिक माहितीसाठी ग्रंथपाल जी डी सगर (9881021569) यांच्याशी संपर्क साधावा. 


Saturday, June 5, 2021

5 जून - जागतिक पर्यावरण दिन

 
(Reference - https://images.app.goo.gl/FqAYtkVp1UV41xz7A)


निवडक संकेतस्थळे (Websites)

विश्व पर्यावरण दिवस - wikipedia.org

जागतिक पर्यावरण दिवस - marathi.webdunia.com

जागतिक पर्यावरण दिन- ५ जून - vikaspedia.in

जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? 2021ची थीम काय आहे? - bbc.com/marathi 

पर्यावरण - vishwakosh.marathi.gov.in

पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज - mahamtb.com

अग्रलेख : पर्यावरण संवर्धन काळाची गरज! - prahaar.in


निवडक ग्रंथ 

ग्यानबाचे पर्यावरण - पूनम सांगवी

पाणी जीवन - डॉ. विजय देशपांडे


निवडक  प्रबंध

ग्रामीण महिलाओ में पर्यावरण संबंधी चेतना: एक समज्शात्रिया अध्ययन




निवडक YouTube - Video

जागतिक पर्यावरण दिन

पर्यावरण - घोषवाक्ये


Thursday, June 3, 2021

Free E-Journals/E-books वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग N-List मध्ये नोंदवावा.

 

(Reference - https://images.app.goo.gl/hb1dRqYxrbXxcayS6)

N-List Consortia

    आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व तसेच कोरोना महामारी च्या काळात विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांसाठी  N-List Consortia हे माहिती मिळवण्याचे मोठे दालन उपलब्ध आहे.  आपणास घरी बसून मोबाईल संगणक लॅपटॉप वर Online E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. N-List Consortia वापरण्यासाठी User ID व Password माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदरील माहिती दालनाचा उपभोग घेण्यासाठी आपण खालील दिलेल्या Google form वर क्लिक करून सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. 

नाव नोंदणी साठी   N-List   येथे क्लिक करा

    आपण भरून दिलेली माहिती इंग्लिश कडे पाठवण्यात येईल त्यानुसार N-List कडून आपणास User ID व Password प्राप्त होईल. यामुळे आपली माहिती ही अचूक स्वरूपात असावी. N-List ची वार्षिक वर्गणी महाविद्यालयीन ग्रंथालयाकडून दरवर्षी भरली जाते. यामुळे सदरील Database चा वापर आपणच करावा.  आपला User ID व Password इतर कोणालाही देऊ नये.  सदरील User ID व Password चा वापर N-List च्या होम पेजवर खालील दिलेल्या माहितीनुसार करावा. 

N-List  होम पेज - https://nlist.inflibnet.ac.in/index.php किंवा Click Here


वरील दिलेल्या प्रमाणे N-List Homepage च्या Members Login पोर्टल वर क्लिक करावे.


User Login मध्ये आपला User ID व Password चा वापर वापर करून 
आपण खाली दिलेले E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व 
तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. 





आपणास N-List Database  वापर करण्यासंदर्भात काही समस्या उद्भवल्यास 
त्या  खालील ईमेल आयडीवर पाठवावीत

1. acscdlibrary20@gmail.com 
2. librarian.acsckilledharur@gmail.com


YouTube Video 



How to use INFLIBNET N-LIST Consortia ?