Friday, September 17, 2021

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्या

 

(Reference - https://commons.wikimedia.org/wiki/File:Marathwada_Liberation_Day_Monument.JPG)


 मराठवाडा मुक्ती साठी शहीद  झालेल्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन ! 

निवडक संकेतस्थळे (Websites)

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन - विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन - mr.vikaspedia.in

१७ सप्टेंबर : मराठवाड्याचा स्वतंत्र दिवस - esakal.com

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : हैदराबादच्या निजामाच्या अब्जावधी रुपयांवरून भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष - bbc.com/marathi

हैदराबाद मुक्तिसंग्राम - mr.wikipedia.org

हैद्राबाद मुक्तीसंग्राम - maayboli.com

मुक्तिसंग्राम स्मारक गौरवास्पद - maharashtratimes.com

हैद्राबाद मुक्ती संग्रामावरील संदर्भ साहित्य - bhausahebumate.com


निवडक ग्रंथ 

हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम - शंकरभाई पटेल

महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे (इ.स.१८१८ १८८४) - डॉ. वि. गो.खोबरेकर

हैदराबाद मुक्तिसंग्राम (Hyderabad Mukti Sangram): १७ सप्टेंबर - मुक्ति दिन - भारतीय स्वातंत्र्य लढयातील अंतिम पर्व. - आबासाहेब वाघमारे

महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी दयानंद सरस्वती - डॉ . प्रकाश मेदककर


निवडक  प्रबंध

हैद्राबाद मुक्ती संग्रामातील नांदेड जिल्हयाचा सहभाग

A study of prisons in Marathwada region a temporal comparison of prison systems before and after Nizams rule

Haidrabad mukti sangramat arya samajache yogdan visheshtha Marathwada

Administration of districts of marathwada under nizams 1853 1935

Nizam Rajyakartyanchi Hindu Vishayak Bhumika Ek Abhyas Vishes Sandarbh Marathwada E S 1861 te 1948

A study of the contribution of marathwada to hyderabad freedom struggle

impact of the nizams rebime on marathwada 1724 1948


निवडक YouTube - Video

मराठवाडा मुक्तिसंग्राम : निजामाचं राज्य कसं झालं भारतात विलीन?

मराठवाडा मुक्तिसंग्राम 17 सप्टेंबर एक शौर्यगाथा निजाम,रझाकाराच्या क्रूरतेचे भयानक वास्तव सखोल इतिहास

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन I पार्श्वभूमी आणि संपूर्ण माहिती I 17 सप्टेंबर




मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्या 


Friday, September 10, 2021

फक्त अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी पुन:श्च परीक्षा

 



विद्यापीठीय उन्हाळी पुन:श्च  परीक्षेसाठी login करतेवेळी विद्यार्थ्यांनी खालील काळजी घेणे आवश्यक आहे. 


1. PRN 
2. Date of Birth
3. Select Active Test 


4. Faculty 
                For - B.A. - Humanities
                       - B.Com - Commerce and Management
                       - B.Sc. - Science and Technology
5. Programme 

6. Date of Exam 
(आपल्या हॉलटिकेत वरील परीक्षा दिनांक येथे लिहावा)

विद्यापीठीय उन्हाळी पुन:श्च परीक्षेसाठी login केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या हॉलटिकेत वरील परीक्षा दिनांक लिहणे आवश्यक आहे . 












ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे online  विद्यापीठीय उन्हाळी परीक्षा देता आली नाही फक्त अश्याच विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा खालील पत्रात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व तारखेप्रमाणे पुन:श्च परीक्षा देता येणार आहे . 





ऑनलाईन परीक्षा पोर्टल लिंक:

(ही लिंक केवळ Google Chrome किंवा  Mozilla Firefox मधूनच ओपन करावी)

https://bamu.unionline.in/login?x=TKw-CrdJYrNf2DH5XxxTur-EErbTCBKUkgAzSIMX-kYYKV-bY6_oYTL-MYMAIEIHI8rdDFSQMY67bMqraJxGxDArIe0 




मार्गदर्शन पर व्हिडिओ लिंक: 

https://www.youtube.com/watch?v=b-grGUeVmRs



अधिक माहितीसाठी संपर्क करावा

विद्यार्थ्यांना (Mock Test )ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात अडचणी दूर करण्यासाठी खालील प्राध्यापकांशी (I.T. Coordinator) संपर्क साधावा.


Mr. G. D. Sagar -  9881021569 , Mr. A. R. Gade - 8744879909.

B. A. -     Dr. D. M. Bharti -      9422353611, 
               Mr. G. D. Bavaskar - 9860213183.

B. Com. - Mr. V. S. Kumbhare - 9423373560,  
                    Dr. Bharat Pagare - 8788675929.

B.Sc. -  Dr. R. R. Bhosle - 8888639309,  
              Mr. A. R. Gade - 8744879909.


विद्यापीठीय अधिकारी - संपर्क क्रमांक 

ऑनलाईन Exam बाबत च्या विद्यापीठाच्या  खालील सूचना चे पालन करावे 

Please use PRN as username and Date of Birth (DDMMYY) as your password (For eg. 1st march 1999 will be 010399).

Checklist/Requirements for Online Examination:

1. Android phone, Desktop, Laptop (Windows / Linux / Mac) with working front camera as webcam.

2. Make sure you are using updated browser such as (Google Chrome or Mozilla Firefox) in incognito mode.

3. Must have an active internet connection.

4. Also make sure your mobile or laptop is fully charged.

5. Keep required stationery handy with you (pencil, pen, rough sheet etc.)

Instructions for Online Examination:

1. Make sure you are using updated browser such as (Google Chrome or Mozilla Firefox)

2. Your Username is your ID and password is your registered mobile number.

3. Please allow camera access whenever prompted by your browser.

4. We will be monitoring the examination. Any malpractices found at your end will not allow you to continue the examination. You will see various warnings before disconnecting. (*Please be alone in the room during the examination.)

5. Once you finish all the questions and want to submit, click on the “Submit Test” button if you want to submit/end the test before the timer expires. If time expires, the exam will be submitted automatically.

Wednesday, September 8, 2021

International Literacy Day (आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस) - 8 Sept.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस


डिजिटल साक्षरता हि काळाची गरज 

    आज ८ सप्टेंबर हा दिवस आपण जागतिक साक्षरता दिवस म्ह्णून साजरा केला जातो. मानवी समाजात साक्षरतेला अनन्यसाधारण महत्व आहे. निरक्षेतेमुळे अशिक्षित समाजावर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत असत . यामुळे भारतात राष्ट्रीय साक्षरतेची सुरुवात १९८८ पासून झालेली दिसून येते. भारतात साक्षरता अभियान हे प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून, सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून समाजात रुजवली जात असत. यामध्ये एखादी व्यक्ती आपले नाव लिहु आणि वाचु शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजले जाते.  परंतु आज याची व्यापकता कमी झलेली दिसून येते. आज बहुतांश समाज हा  विविध माहिती तंत्रज्ञाच्या साधनांच्या साह्याने डिजिटल साक्षरतेशी जोडला गेला आहे. यामुळे सर्व जगाचे एका खेड्यात रूपांतर झालेले दिसून येते. 

    संगणकाच्या उत्पत्तीनंतर वास्तविक स्वरूपात डिजिटल साक्षरतेची सुरुवात झाली. यानंतर संगणकांच्या अनेक पिड्या जसजसा विकसित होत गेल्या त्याप्रमाणे डिजिटल साक्षरतेमध्ये व्यापकता येऊ लागली. देशातील नागरिक संगणकामध्ये प्रशिक्षित व्हावा या उद्देशाने शासनाने संगणकावर आधारित प्रमाणपत्र परीक्षा नोकरीसाठी अनिवार्य करण्यात आल्या. MS _CIT हे डिजिटल साक्षरतेचे आपणास उत्तम उदाहरण घेता येईल . यामुळे  बहुतांश समाज संगणक वापरांशी जोडला गेला. 


    दोन दशकापासून मोबईल जगतातील झालेला आमूलाग्र बदल हा डिजिटल साक्षरतेमधील मोलाचा पैलू मानावा लागेल. कारण मोबईल हे डिजिटल साधन आपण आज समाजातील प्रत्येक घटकाकडे पाहत आहोत. मग आपल्यापुढे हा प्रश्न पढतो कि फक्त मोबाईलचा वापर करता येणे हि डिजिटल साक्षरता समजावी का ? कारण लहान मुलांना अक्षरांची ओळख नसतानाही ते मोबाईल चा वापर चिनांहनच्या साह्याने आपल्याही पेक्षा चांगला करीत आहेत. 

    या कोरोना महामारीच्या काळात डिजिटल साक्षरता वाढीस प्रोत्साहन मिळाले हे जरी खरे असले तरी आपण डिजिटल संसाधने मर्यादित स्वरूपातच वापरता आहोत म्हणजेच या साधनांचा वापर फक्त मनोरंजनासाठी , Social Networking Site , मोबाईल गेम्स मोठ्या प्रमाणावर होत आहे . परंतु शासनाकडून E -Governance , E -learning ,  E -Commerce , E -Banking , Online माहिती यासारख्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून  आपण प्रत्यक्ष व अप्रत्क्ष स्वरूपात या डिजिटल साक्षरतेशी जोडलो गेलो आहोत . 

    आजच्या शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल साक्षरता हे अत्यंत महत्त्वाचे असून समाजातील प्रत्येक शैक्षणिक समूहाला याचा नक्कीच फायदा होतो. आजच्या कोरोना च्या परिस्थितीत ई लर्निंग ही संकल्पना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात स्वीकृत झालेली आहे. Zoom app व इतर ॲपद्वारे शिक्षक व विद्यार्थी वर्ग एकमेकाशी भौगोलिकदृष्ट्या दूर असूनही जोडला गेला आहे. ई-माहिती साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून याचा वापर व्यापक स्वरूपात होत आहेत. पूर्वीच्या काळी वाचक हा माहिती मिळवण्यासाठी ग्रंथालयाकडे येत असत परंतु ई-माहिती साधनाद्वारे वाचक घरी बसून आपल्या मोबाईलवर सदरील माहिती साधने वाचू शकतात व जतन करून  ठेवू शकतात. डिजिटल साक्षरते मुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. शासनाद्वारे MOOC, Swayam etc. ऑनलाइन कोर्सेस ची निर्मिती करण्यात आलेली आहे सदरील कोर्स हा विद्यार्थी घरी बसून ऑनलाइन माध्यमातून पूर्ण करू शकतो. व तसेच NDLI, INFLIBNET,  N-LIST etc.च्या माध्यमातून ई माहिती साधने उपलब्ध केली जात आहेत.

    शिक्षण क्षेत्रात काही तज्ञांच्या मते ई लर्निंग ही फायदेशीर ठरणार नाही परंतु या कोरोना च्या परिस्थितीत व जागतिक शिक्षण प्रणालीचा विचार करता डिजिटल साक्षरता ही शैक्षणिक समूहाने स्वीकारली आहे व आपणही ती स्वीकारावी अन्यथा डिजिटल जगामध्ये आपण शैक्षणिक विकासात बाहेर फेकले जाऊत या उद्देशाने सदरील लेख आपल्यासमोर ठेवत आहोत. 

 

जागतिक साक्षरता दिनानिमित्त खालील संदर्भ साधने वाचावीत