आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस
डिजिटल साक्षरता हि काळाची गरज
आज ८ सप्टेंबर हा दिवस आपण जागतिक साक्षरता दिवस म्ह्णून साजरा केला जातो. मानवी समाजात साक्षरतेला अनन्यसाधारण महत्व आहे. निरक्षेतेमुळे अशिक्षित समाजावर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत असत . यामुळे भारतात राष्ट्रीय साक्षरतेची सुरुवात १९८८ पासून झालेली दिसून येते. भारतात साक्षरता अभियान हे प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून, सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून समाजात रुजवली जात असत. यामध्ये एखादी व्यक्ती आपले नाव लिहु आणि वाचु शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजले जाते. परंतु आज याची व्यापकता कमी झलेली दिसून येते. आज बहुतांश समाज हा विविध माहिती तंत्रज्ञाच्या साधनांच्या साह्याने डिजिटल साक्षरतेशी जोडला गेला आहे. यामुळे सर्व जगाचे एका खेड्यात रूपांतर झालेले दिसून येते.
संगणकाच्या उत्पत्तीनंतर वास्तविक स्वरूपात डिजिटल साक्षरतेची सुरुवात झाली. यानंतर संगणकांच्या अनेक पिड्या जसजसा विकसित होत गेल्या त्याप्रमाणे डिजिटल साक्षरतेमध्ये व्यापकता येऊ लागली. देशातील नागरिक संगणकामध्ये प्रशिक्षित व्हावा या उद्देशाने शासनाने संगणकावर आधारित प्रमाणपत्र परीक्षा नोकरीसाठी अनिवार्य करण्यात आल्या. MS _CIT हे डिजिटल साक्षरतेचे आपणास उत्तम उदाहरण घेता येईल . यामुळे बहुतांश समाज संगणक वापरांशी जोडला गेला.
दोन दशकापासून मोबईल जगतातील झालेला आमूलाग्र बदल हा डिजिटल साक्षरतेमधील मोलाचा पैलू मानावा लागेल. कारण मोबईल हे डिजिटल साधन आपण आज समाजातील प्रत्येक घटकाकडे पाहत आहोत. मग आपल्यापुढे हा प्रश्न पढतो कि फक्त मोबाईलचा वापर करता येणे हि डिजिटल साक्षरता समजावी का ? कारण लहान मुलांना अक्षरांची ओळख नसतानाही ते मोबाईल चा वापर चिनांहनच्या साह्याने आपल्याही पेक्षा चांगला करीत आहेत.
या कोरोना महामारीच्या काळात डिजिटल साक्षरता वाढीस प्रोत्साहन मिळाले हे जरी खरे असले तरी आपण डिजिटल संसाधने मर्यादित स्वरूपातच वापरता आहोत म्हणजेच या साधनांचा वापर फक्त मनोरंजनासाठी , Social Networking Site , मोबाईल गेम्स मोठ्या प्रमाणावर होत आहे . परंतु शासनाकडून E -Governance , E -learning , E -Commerce , E -Banking , Online माहिती यासारख्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष व अप्रत्क्ष स्वरूपात या डिजिटल साक्षरतेशी जोडलो गेलो आहोत .
आजच्या शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल साक्षरता हे अत्यंत महत्त्वाचे असून समाजातील प्रत्येक शैक्षणिक समूहाला याचा नक्कीच फायदा होतो. आजच्या कोरोना च्या परिस्थितीत ई लर्निंग ही संकल्पना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात स्वीकृत झालेली आहे. Zoom app व इतर ॲपद्वारे शिक्षक व विद्यार्थी वर्ग एकमेकाशी भौगोलिकदृष्ट्या दूर असूनही जोडला गेला आहे. ई-माहिती साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून याचा वापर व्यापक स्वरूपात होत आहेत. पूर्वीच्या काळी वाचक हा माहिती मिळवण्यासाठी ग्रंथालयाकडे येत असत परंतु ई-माहिती साधनाद्वारे वाचक घरी बसून आपल्या मोबाईलवर सदरील माहिती साधने वाचू शकतात व जतन करून ठेवू शकतात. डिजिटल साक्षरते मुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. शासनाद्वारे MOOC, Swayam etc. ऑनलाइन कोर्सेस ची निर्मिती करण्यात आलेली आहे सदरील कोर्स हा विद्यार्थी घरी बसून ऑनलाइन माध्यमातून पूर्ण करू शकतो. व तसेच NDLI, INFLIBNET, N-LIST etc.च्या माध्यमातून ई माहिती साधने उपलब्ध केली जात आहेत.
शिक्षण क्षेत्रात काही तज्ञांच्या मते ई लर्निंग ही फायदेशीर ठरणार नाही परंतु या कोरोना च्या परिस्थितीत व जागतिक शिक्षण प्रणालीचा विचार करता डिजिटल साक्षरता ही शैक्षणिक समूहाने स्वीकारली आहे व आपणही ती स्वीकारावी अन्यथा डिजिटल जगामध्ये आपण शैक्षणिक विकासात बाहेर फेकले जाऊत या उद्देशाने सदरील लेख आपल्यासमोर ठेवत आहोत.
जागतिक साक्षरता दिनानिमित्त खालील संदर्भ साधने वाचावीत
Hi
ReplyDelete