Thursday, December 23, 2021

वाचकांसाठी QR Code वर आधारीत उपस्थिती व अन्य माहितीसेवा





QR Code म्हणजे Quick Response Code याद्वारे आपण वाचकांना , विद्यार्थ्यांना कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती दिली जाते. सदरील QR Code चा वापर आपण दैनंदिन जीवनात पाऊल  करीत असतो जसे कि आपण मॉल, शॉप मध्ये खरेदी करीत असताना, Phone  Pay अँपवरून पैसाची देवाणघेवाण करण्यासाठी, Registration साठी , पुस्तकांमध्ये,  कमी वेळेत जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी इ. यासंदर्भात आपण अलीकडील काळात सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रंजितसिंह डिसले याना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज पुरस्कार सुद्धा क्युआर कोडेड पुस्तकांसंदर्भात देण्यात आला. 


QR code चे महत्व लक्षात घेऊन आपल्या महाविद्यालयीन ग्रंथालयाने वाचकांसाठी QR Code वर आधारीत उपस्थिती नोंदविणे व अन्य माहितीसेवा कमीत कमी वेळेत वाचकांपर्यंत पोहचिवण्यासाठी ग्रंथालयात QR Code चे उपयोजन केलेले आहे. सर्व वाचकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा हि विनंती.   

QR code  चा वापर करून आपली उपस्थिती कशी नोंदवावी 

१. आपल्या मोबाईल मध्ये Google Play Store अँप मधून बारकोड स्कॅनर डाउनलोड करावे .
२. सदरील बारकोड स्कॅनर  वरून Library Attendance चा QR code स्कॅन करावा .
३. QR code स्कॅन केल्यानंतर Open Browser मधून लिंक उघडावी. 
४. आपणास Google Form दिसेल .
५. सदरील  Google Form माहिती भरावी व submit करावे.
६. आपण सबमिट बटन प्रेस केल्याबरोबरच आपली उपस्थिती ऑनलाईन स्वरूपात नोंदवली जाईल.


 QR code आधारीत ग्रंथालयीन माहितीसेवा

आपल्या महाविद्यालयीन ग्रंथालयात QR code वर आधारीत खालील ग्रंथालयीन माहितीसेवा
उपलब्ध आहेत. 

१. WebOPAC 
ग्रंथालयात WebOPAC चा QR code  उपलब्ध असून सदरील सेवेमार्फत आपण महाविद्यालयीन ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथाचा लेखक , शीर्षक , विषय , प्रकाशक इत्यादी नुसार ग्रंथाचा शोध घेता येते. पूर्वीच्या काळी ग्रंथ शिधण्यासाठी तालिकापात्राचा वापर केला जात असत यामध्ये पुष्कळ वेळ वाया जात होता परंतु आपण या WebOPAC सेवेच्या माध्यमातून काही सेकंदामध्ये ग्रंथालयात पुस्तक उपलब्ध आहे कि नाही ते आपल्या मोबाईल वरती पाहू शकतो.    

२. Online E -resources 

ग्रंथालयात  Online E -resources साठी N-List Consortia व विद्यापीठीय ग्रंथालयाकडून Remote Access असे दोन QR code  उपलब्ध असून 
     आपणास मोबाईल  वर Online E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. N-List Consortia वापरण्यासाठी User ID व Password माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदरील माहिती दालनाचा उपभोग घेण्यासाठी आपण खालील दिलेल्या Google form वर क्लिक करून सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. 

नाव नोंदणी साठी   N-List   येथे क्लिक करा

 3. Library Blog

Library Blog च्या माध्यमातून सर्व वाचकांना Selective Dissemination Service , Current Awareness Service  व   Reference Service हि  माहितीसेवा Online स्वरूपात देता येते सर्व माजी विद्यार्थी , पालक व all academic stakeholders विनंती आहे कि, त्यांनी सदरील माहितीच्या अपडेट साठी खालील WhatsApp Group मध्ये सहभागी व्हावे. 

Click Here for Join WhatsApp Group

Library Blog Link Click Here to Visit Library Blog 

   सदरील लिंक हि महाविद्यालयाच्या website वर हि उपलब्ध आहे 

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील सर्व ब्लॉगपोस्ट पाहण्यासाठी Click Here


4. Feedback Form

ग्रंथालयात Feedback चा QR code  उपलब्ध असून सदरील सेवेमार्फत वाचकांना कमीत कमी वेळेत Feedback Form भरता येतो.  


5. Requisition Form

       ग्रंथालयात Feedback चा QR code  उपलब्ध असून सदरील सेवेमार्फत वाचकांना विनाविलंब ग्रंथाची मागणी ऑनलाईन स्वरूपात  करता येते. 

आपण QR code विषयी आणखीन जाणून घेण्यासाठी खालील youtube चे video पहावेत 
 











 


2 comments: