किल्लेधारूर:- येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले धारूर येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला वाचन प्रेरणा दिन विविध कार्यक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालयीन ग्रंथालयाद्वारे साहित्यात्मक व स्पर्धात्मक ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले होते. सदरील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन धारूर पोलीस स्टेशन मधील सहायक पोलिस निरीक्षक ,श्री.घोडे साहेब व श्री. बास्टे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील ग्रंथ प्रदर्शनास वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
धारूर महाविद्यालय ग्रंथालय व एस एम ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय ग्रंथालय , कळंब यांच्या संयुक्त विद्यमानाने 'वाचन संस्कृती: महत्व व आव्हाने' या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन केले होते. सदरील ऑनलाइन कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. उद्धव आघाव, ग्रंथपाल संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड यांनी ग्रंथालयाने आपल्या माहिती सेवेत वाढ करून, विविध कार्यक्रमाद्वारे वाचन संस्कृती वृद्धिगत करण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोविंद घोगरे ग्रंथपाल, लोकमान्य महाविद्यालय सोनखेड यांनी ज्ञानरूपी समाजासाठी वाचन संस्कृतीचे संवर्धन व जतन झाले पाहिजे असे आपले मनोगत मांडले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथपाल गोपाळ सगर यांनी व्याख्यानाच्या विषयाचे महत्त्व प्रतिपादित केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे , स्वागत मनोगत प्राचार्य डॉ. सुनील पवार, साधन व्यक्तींचा परिचय ग्रंथपाल अनिल फाटक यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य मेजर डॉ मिलिंद गायकवाड, उपप्राचार्य प्रा महादेव जोगडे,पर्यवेक्षक प्रा सिद्धेश्वर काळे यांची उपस्थिती होती.सदरील व्याख्यानाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन कुंभार व आभार प्रदर्शन श्री अरविंद शिंदे यांनी केले. या ऑनलाईन व्याख्यानाच्या कार्यक्रमात दोनही महाविद्यालयातील वाचकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
खालील लिंक ला Click करून सहभाग नोंदवावा
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/82997504918?pwd=OWVIREk0U3dVTk9GMk40MUdUeW10QT09
YouTube Link
या विविध कार्यक्रमाद्वारे वाचन प्रेरणा दिन महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment