Saturday, February 11, 2023

Online Educational Resources (OER's) for users

 

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/20/Global_Open_Educational_Resources_Logo.svg/1200px-Global_Open_Educational_Resources_Logo.svg.png

सध्याचे युग हे इंटरनेट काओ युग म्हणून संबोधले जाते. आपणास हवी असलेली माहिती आपण इंटरनेटच्या मध्यतमातून एका क्लिक मध्ये काही सेकांदामध्ये पाहू शकतो ती डाउनलोड करून जातं करून ठेऊ शकतो. यासाठी वाचकांना आवश्यकता असते ती म्हणजे योग्य अश्या माहितीदालनाची. इंटरनेट वर मोठय प्रमाणात मोफत स्वरुपात काही Online Educational Resources उपलबद्ध आहेत. या E-resources माहिती व त्याच्या संकेतस्थळ याविषयाची माहिती आपल्या वाचकाना व्हावी या उद्देशाने सदरील ब्लोग्पोस्त ची निर्मिती करण्यात येत आहे. 


1.  DOAB https://www.doabooks.org/

DOAB हा पुस्तकांचा मेटाडेटा असून तो मोफत स्वरुपात सर्व  वाचकांसाठी वरील संकेतस्थळावर२४ तास उपलब्ध आहे. सदरील database हा प्रकाशकांचा वेबसाइटवरील प्रकाशनांच्या संपूर्ण मजकुराची थेट लिंक प्रदान करते. या database मध्ये  सर्व विषयांचा समावेश दिसून येत असला तरी यामध्ये मुख्येत्वे मानवता, कायदा आणि सामाजिक विज्ञानांवर लक्ष केंद्रित केले आहे.

2. Project Gutenberg : https://www.gutenberg.org/

Project Gutenberg हा ई बुक्स ची निर्मिती व वितरणासाठी चालना देणारा database आहे. सदरील database हा खप जुना असून त्याची निर्मिती १९७१ मध्ये अमेरेकेतील सुप्रसिद्ध लेखक Michael S. Hart यांनी केली. सदरील database हा https://www.gutenberg.org/ या संकेतस्थळावर विनामुल्य उपलबद्ध आहे. या database मधील बहुतेक संग्रह हा सार्वजनिक डोमेनमधील पुस्तके किंवा वैयक्तिक कथांचे संपूर्ण मजकूर आहेत.

3. मराठी ebooks : http://sahitya.marathi.gov.in/

मराठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. यानुसार ज्ञानाचा हा अनमोल ठेवा असलेली मंडळाची ४४४ पुस्तके जशी आहेत त्या स्वरुपात मंडळाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहेत.

4. JSTOR : https://www.jstor.org/

William G. Bowen यांनी JSTOR ची १९९५ मध्ये  न्यूयॉर्क येथे केली. यामध्ये शैक्षणिक जर्नल्सचे डिजिटायझ्ड, बॅक इश्यू असलेले, त्यात आता पुस्तके आणि इतर प्राथमिक स्रोत तसेच सामाजिक विज्ञानातील जर्नल्सचे वर्तमान अंक समाविष्ट आहेत. सदरील database हा मोठ्या प्रमाणात संशोधकाकडून  जर्नल्स साठी वापरला जातो. 


INFLIBNET चा  Full form Information and Library Network असा आहे. हे एक स्वायत्त आंतरविद्यापीठीय केंद्र असून विद्यापीठ अनुदान आयोग (शिक्षण मंत्रालय , भारत सरकार) यांच्या अंतर्गत कार्यरत आहे.  INFLIBNET हे माहितीचा वापर  मोठ्या प्रमाणात होण्यासाठी व तसेच  संशोधन , अध्ययन व शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अविरत कार्य करीत असते. मुख्यत्वे संशोधन कार्याचे जतन, संवर्धन व प्रसारण सदरील संस्थेकडून केले जाते. सर्व शैक्षणिक भागधारकांना मोफत स्वरूपात माहिती देण्यासाठी सदरील संस्थेने खालील उपक्रम सुरु केले आहे. या उपक्रमातील माहिती आपण  मोफत स्वरूपात पेज टू पेज वाचू शकता , डाउनलोड करू शकता . सदरील उपक्रमातील माहिती हि अद्ययावत व विश्वसनीय स्वरूपाची असल्यामुळे संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी हे एक विश्वसनीय माहितीचे दालनच आहे. यामुळे सर्व वाचकांनी विशेषतः संशोधकांनी सदरील माहितीचा जास्तीत जास्त वापर करावा. 

5.1. Shodhganga - Home Page

संशोधकांसाठी shodhganga हि एक संजीवनी स्वरूपात कार्यरत आहे . संशोधकाला आपल्या संशोधन विषयावर उपलब्ध संशोधन थिसीस हे पेज टू पेज पाहता येतात . विशेषतः एका निर्देशामध्ये सदरील थिसीस उपलब्ध असल्यामुळे ते शोधण्यास सोपे आहे. विशिष्ट प्रकरणातील विशिष्ट माहिती कमीत कमी वेळात पाहता येते . भारतामधील जवळपास सर्व विद्यापीठे आपल्याकडील थिसीस हे शोधगंगा वर उपलब्ध करून ठेवत असल्यामुळे संशोधकांचा वेळ , श्रम व आर्थिक बचत होत आहे. सदरील संशोधन प्रकल्प हे संशोधकास विद्यापीठांनुसार , मार्गदशकानुसार , संशोधकांनुसार, विषयानुसार, विशिष्ट संकल्पनेनुसार पाहता येतात . सद्यपरिस्थितीत 327336 एवढा थिसीस चा संग्रह शोधगंगा संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   

5.2. Shodhganghotri - Home Page

शोधगंगोत्री हा उपक्रम नवीन संशोधकांसाठी संशोधनाचा विषय ठरवण्यासाठी अतिशय मार्गदर्शक आहे. शोधगंगोत्री संकेतस्थळावर भारतामधील संशोधकांचे संशोधन आराखडे , प्रकल्प आराखडे पाहता येतात व ते डाउनलोड करू शकतात . सदरील संशोधन आराखडे , संशोधन प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप हे संशोधकास विद्यापीठांनुसार , मार्गदशकानुसार , संशोधकांनुसार, विषयानुसार, विशिष्ट संकल्पनेनुसार पाहता येतात . 

5.3. Institutional Repository - Home Page

Institutional Repository या उपक्रमाद्वारे  INFLIBNET चा संस्थेतील प्रकाशाने वाचकांना उपलध करून दिली आहेत. यामध्ये वाचकांना INFLIBNET in Press and Media, InFLIBNET Conventin Proceedings  INFLIBNET Publications हि संस्थेची माहिती साधने Author, Subject व Date issued व च्या माध्यमातून पाहता येतात .  

5.4. INFOPORT - Home Page

INFOPORT   हा Indian Electronic Resource  चा  Subject Gateway असून यामध्ये वाचकांसाठी  भारतातील Online Scholarly Content उपलब्ध आहेत . यामध्ये वाचकांना वर्णानुक्रमे , दशांश वर्गीकरण तालिका संहितेनुसार माहितीच शोध घेता येतो . सदरील उपक्रमामध्ये खालील माहितीसाधेने आपणास पाहता येतात .


5.5 Research Project Database - Home Page

Research Project Database या उपक्रमाद्वारे INFLIBNET ने  संशोधनाचा database वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे .  UGC, ICMR, ICAR, DST व DBT या संस्थेने funded केलेल्या प्रोजेक्ट्स ची तपशीलवार माहिती सदरील database मध्ये उपलब्ध आहे. 


6. NDLI : https://ndl.iitkgp.ac.in/ 

     NDLI हे एक माहिती प्रतिप्राप्तीचे योग्य दालन होय. NDLI चा  Long-form आहे National Digital Library of India. NDLI हा Ministry of Education, Government of India अंतर्गत प्रकल्प असून ही एक Digital Repository आहे.सदरील प्रकल्पाचे कामकाज  IIT, Khargpur संस्थेअंतर्गत पाहिले जाते. सदरील प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा शैक्षणिक व संशोधनासाठी उपयुक्त अशी  ई - माहितीसाधने  मोफत स्वरूपात वाचकांना उपलब्ध करुण देणो हा आहे. 
   Home Page - https://ndl.iitkgp.ac.in/
आपणास होमपेजवर Search option दिसेल त्यावर क्लिक करून माहिती शोधता येते. कोरोना महामारीच्या काळात NDLI ने COVID-19 RESEARCH REPOSITORY ची सुविधा उपलब्ध केली आहे. कोरोना काळात वाचकांना घरी बसून सदरील इ - वाचनासाहित्याचा लाभ घेता येतो. होमपेजच्या डाव्या बाजूस Browse (माहितिचे वर्गीकरण ) व उजव्या बाजूस Login (NDLI वर लॉगिन होण्यासाठी)   हे  पोर्टल दिले आहे. 



NDLI App 

Go To on Mobile Play store & download NDLI App


Browse 

माहितीशोध प्रक्रियेत माहिती हि त्याचा स्वरूपानुसार ,विषयानुसार, माहितीसाधनानुसार तसेच Learning  Resources नुसार शोधण्यासाठी मदत होते .



खालील लिंक वर क्लिक करून आपण NDLI CLUB चे Member होऊ शकता.




नोट : Passkey हा सर्वानी खालील लिहावा

 d4e72e6e-3f01-4042-ac9a-1d0e8b59d9e4

आपले नाव NDLI CLUB मध्ये नोंदविल्यानंतर आपल्या ईमेल वर एक verification  mail प्राप्त होतो. सदरील मेल verified केल्यानंतर आपली या क्लब मधील नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. 





Friday, February 10, 2023

Effective Use of E-resources (subscribed)




कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयीन  ग्रंथालायाद्वारे दरवर्षी आपल्या वाचकांसाठी खालील databases subscribed केले जातात. सदरील databases चा आपण जास्तीत जास्त वापर करावा व तसेच या databases चा प्रभावी वापर कसा करावा या उद्देशाने सदरील ब्लॉग पोस्ट ची निर्मिती करण्यात येत आहे. 

1. N-LIST Consortia 

E-books- 1,64,300 ; E-Journals - 6,000

2. Remote Access of KRC 

E-books- 4078 ; E-Journals - 9,900


1. N-LIST Consortia

(National Library & Information Services Infrastructure for Scholarly Content) 


आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात  विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांसाठी  N-List Consortia हे माहिती मिळवण्याचे मोठे दालन उपलब्ध आहे.  आपणास घरी बसून मोबाईल संगणक लॅपटॉप वर Online E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. N-List Consortia वापरण्यासाठी User ID व Password माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदरील माहिती दालनाचा उपभोग घेण्यासाठी आपण खालील दिलेल्या Google form वर क्लिक करून सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. 

नाव नोंदणी साठी   N-List   येथे क्लिक करा


आपण भरून दिलेली माहिती N - List कडे पाठवण्यात येईल त्यानुसार N-List कडून आपणास User ID व Password प्राप्त होईल. यामुळे आपली माहिती ही अचूक स्वरूपात असावी. N-List ची वार्षिक वर्गणी महाविद्यालयीन ग्रंथालयाकडून दरवर्षी भरली जाते. यामुळे सदरील Database चा वापर आपणच करावा.  आपला User ID व Password इतर कोणालाही देऊ नये.  सदरील User ID व Password चा वापर N-List च्या होम पेजवर खालील दिलेल्या माहितीनुसार करावा. 

N-List  होम पेज - https://nlist.inflibnet.ac.in/index.php किंवा Click Here


वरील दिलेल्या प्रमाणे N-List Homepage च्या Members Login पोर्टल वर क्लिक करावे.


User Login मध्ये आपला User ID व Password चा वापर वापर करून 
आपण खाली दिलेले E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व 
तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. 

E-Resources @N-LIST
Subscribed e-Journals and e-Books

The Consortium subscribes to the following resources for the colleges. 

All electronic resources subscribed under N-LIST Programme are availablefrom the publisher's website.




 Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, 
Aurangabad


Mobile App 

ज्ञान स्तोत केंद्र , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद  द्वारे आपल्या महाविद्यालयीन ग्रंथालयास ई-संसाधने वापरण्यासाठी Remote Access उपलब्ध झालेला आहे. सदरील ई-बुक , ई- जर्नल्स हे महाविद्यालयीन प्रध्यापकासाठी , संशोधकासाठी अतिशय उपयोगाचा आहे. सदरील database च्या माध्यमातून आपणास आपल्या विषयातील  नामांकित्त व दर्जेदार  ई- जर्नल्स चा वापर करता येतो. 

सदरील database चा वापर आपण कसा करावा ? यासंदर्भात मार्गदर्शनासाठी मुख्यत्वे प्राध्यापकांसाठी सदरील ब्लोग्पोस्ट  ची निर्मिती करण्यात येत आहे. 



१. प्रथमतः आपल्या ई-मेल वरती ज्ञान स्तोत केंद्र , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मार्फत सदरील database चा वापराकरिता User ID व Password देण्यात आलेले आहेत. याच खाती करून घ्यावी. तसेच एक KRC Remote Access पोर्टल लिंक दिलेली आसते . 



२. सदरील लिंक ला क्लीक केल्यानंतर आपणास पोर्टल चे होमेपेज खालीलप्रमाणे दिसेल. 




. सदरील पोर्टल वरती Sign In मध्ये आपण User ID व Password लिहावा. 




४.  पोर्टल च्या उजव्या बाजूस आपले नाव दिसून येईल. 



५.   आपली लॉगीन ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खालील database आपण वापर करू शकता.

mLibrary (Your Mobile Library)  App चा योग्य वापर 


१. प्रथमतः mLibrary App आपल्या Google Play Store वरून इंस्टॉल करावा 




२.  mLibrary App Install केल्यानंतर  आपल्या युजर आयडी व पासवर्ड Registration करावे.




३. Registration केल्यानंतर App वरील डाव्या बाजूस आपल्या नावाची खात्री करून घ्यावी.  





४. आपली Profile update केल्या नंतर खालीलप्रमाणे आपला फोटो व  Profile update होईल 



५. लोगिन प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर खालीलप्रमाणे तीन database दिसून येतील 



६. Content मध्ये ebook व Journal हे दोन Database महत्वाचे आहेत. 





७.  ebook मध्ये खालीलप्रमाणे लिस्ट दिसून येईल / Search करू शकता 





८. उदा. - Chemistry वरील पुस्तकावर क्लिकवर आपणास खालील पुस्ताची पूर्ण पाने वाचता येतील. 


९.  Journal मध्ये खालीलप्रमाणे लिस्ट दिसून येईल / Search करू शकता




१०.उदा. - Economics  वरील क्लिकवर आपणास खालील प्रमाणे ते journal मधील लेख वाचता येतील. 





११. BAMU Repository मध्ये  खालीलप्रमाणे वेगवेगळ्या Repositories दुसून येतील 




वरील दिलेल्या सुचने प्रमाणे आपण Remote Access of E-resources चा योग्य तो वापर करावा व तेसच वापरासंदर्भात अडचणी आल्यास ग्रंथपालाशी संपर्क साधावा. 

 librarian.acsckilledharur@gmail.com 


Wednesday, February 8, 2023

Digital Newspaper Clipping Service - Jan. 2023

 

डिजिटल वृत्तपत्र क्लिपिंग सेवा - 2023

सर्व वाचकांना महाविद्यालयातील कार्यक्रमाची, महाविद्यालयाशी निगडीत वर्तमानपत्रातील बातम्यांची इ . बाबतीत माहिती मिळावी या उद्देशाने महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या वतीने डिजिटल वृत्तपत्र क्लिपिंग सेवा या ब्लॉग ची निर्मिती केली आहे.

सेच सदरील ब्लॉगच्या माध्यमातून माहिती Current Awareness Service, Selective Disseminative Service, Reference Service , Information regarding Competitive Exam, Advertisement, Literature Search Service, Referral Service, Digital Newspaper Clipping service ,  Referral  Service इ. सेवा पुरविण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. 

वाचकांनी   Follow  बटन क्लिक करून आपण ग्रंथालय ब्लॉगचे Followers होऊन आमच्या ऑनलाईन माहिती सेवेचा लाभ घ्यावा. 

ही विनंती. 


जानेवारी २०२३ 






























डिसेंबर   २०२२























नोव्हेंबर   २०२२

























ऑक्टोबर   २०२२






































सेप्टेंबर   २०२२ 














































ऑगस्ट २०२२ 






















जुलै २०२२ 





















 


















मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. आ. प्रकाशदादा सोळंके साहेब सत्कार करीत असताना  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ  काकडे याप्रसंगी उपस्थित मा. धैर्यशील  सोळंके साहेब


 महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी विराजमान प्राचार्य डॉ. गोपाळ  काकडे याप्रसंगी उपस्थित महविद्यालय विकास समिती सदस्य मा. अजयसिंह दिख्खत , मा. डॉ. राम शिनगारे , मा. इंद्रजीत जाधव व प्र. प्राचार्य  प्रोफ. डॉ . दीपक भारती  


महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रोफ. डॉ . दीपक भारती सरांकडून प्राचार्य पदी पदभार स्वीकारत असताना  महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. गोपाळ  काकडे 


जुन २०२२












मे २०२२
















एप्रिल  २०२२

































मार्च २०२२























फेबुवारी २०२२  








 



जानेवारी २०२२