मरठी ई बुक्स pdf स्वरुपात - एप्रिल २०२३
एप्रिल २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी खालील पुस्तके upload केली आहेत. वाचकांना सदरील ग्रंथसंपदेचा मोफत आस्वाद घेता येतो.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
मराठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते. हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती प्रचलित जागरूकता सेवेच्या (Current Awarness Service ) माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रंथालयाद्वारे सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती करण्यात येत आहे .
No comments:
Post a Comment