जागतिक पुस्तक दिन व ई- माहितीसाधने
जागतिक पुस्तक दिन आपण दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा करत असतो. युनेस्को व इतर काही संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. ज्या जागतिक दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे जगातील लेखक आणि पुस्तकाचा सन्मान करणे व वाचण्याची सवय वाढवणे हा होय. युनेस्को प्रत्येक वर्षी एका वर्षासाठी वर्ल्ड बुक कॅपिटल ची निवड दिनांक 23 एप्रिल 1995 पासून करत आहे. म्हणजेच एका देशाच्या राजधानीची निवड वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून करते. भारतामध्ये इ. स. 2003 मध्ये नवी दिल्ली येथे वर्ल्ड बुक कॅपिटल साजरा करण्यात आला. गतवर्षी 2023 मध्ये घानाची राजधानी अक्राला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड करण्यात आली होती. तर यावर्षी 23 एप्रिल 2024 रोजी फ्रान्स ची राजधानी स्ट्रासबर्ग हे शहर वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मानवी जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्ती माहिती मिळवण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी, संशोधनासाठी, मनोरंजन व इतर कार्यासाठी पुस्तकांचा आधार घेत असतो. पुस्तकाचा इतिहास अतिशय प्राचीन असला तरी मुद्रण कलेच्या शोधापासून खऱ्या अर्थाने पुस्तके समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली. नंतरच्या काळात पुस्तके हे ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, मासिके, नियतकालिके, दैनिके अशा अनेक स्वरूपात प्रकाशित करण्यात येऊ लागली. यामुळे अनेक स्वरूपात प्रकाशित पुस्तके पुस्तकालय, वाचनालय व ग्रंथालयात वाचकांसाठी उपलब्ध होऊ लागली. शैक्षणिक दृष्टिकोनातून 20 व्या शतकामध्ये वाचक हा पुस्तक वाचण्यासाठी ग्रंथालयावर अवलंबून होता. वाचकाला हवी असलेली माहिती मोठ्या प्रमाणात अनेक ग्रंथातून घेण्यासाठी तू तसं ग्रंथालयात बसून माहितीचे संग्रह करत होता. यामुळे या दशकामध्ये ग्रंथालयाला खूप महत्त्व प्राप्त झाले.
भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी पुस्तके व ग्रंथ यांचे महत्त्व लक्षात घेऊन 1928 मध्ये ग्रंथालय शास्त्राचे मूलभूत पाच सिद्धांत पुढील प्रमाणे मांडले. ग्रंथ हे उपयोगी असतात, प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे, वाचकांचा वेळ वाचला पाहिजे व ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. पंचसूत्री मुळे ग्रंथपालन व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ग्रंथाचे जतन, संवर्धन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. वाचकांचे समाधान हा एकमेव उद्देश लक्षात ठेवून ग्रंथालय आपले काम करू लागले. ग्रंथालयाकडून वाचकांसाठी नवनवीन सेवा करून दिल्या जात असत.
एकविसाव्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणात वाढ व विकास झाल्यामुळे पुस्तके ग्रंथ ही ई-माहिती साधना द्वारे स्वरूपात प्रकाशित होऊ लागली. माहितीचे माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने इंटरनेटच्या माध्यमातून केलेले प्रकाशन म्हणजेच ई-माहिती साधने होय. यामध्ये ई -बुक्स ई-जर्नल, ई-मॅक्झिन, ई-डेटाबेसेस, ई-प्रबंध व इतर ई-माहितीसाधनाचा समावेश होतो. सध्याचे युगे माहिती तंत्रज्ञानाचे योग म्हणून संबोधले जाते. यामुळे वाचकांकडून मोठ्या प्रमाणात ई-माहितीसाधना चा वापर दिसून येत आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात संशोधकांसाठी व वाचकांसाठी ई-माहितीसाधने वरदान ठरत आहेत. ई-माहितीसाधने ही त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यामुळे 24 तास उपलब्ध असतात, ते अधिक वेगाने वाचकापर्यंत पोहोचतात तसेच एखादा लेखक आपल्या वाचकापर्यंत आपली माहिती पोहोचू शकतो. ई-माहितीसाधने वापरल्यामुळे वेळ, श्रम व पैसा बचत होते. तसेच ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात भेडसावणारा प्रश्न म्हणजे जागेची कमतरता व रामनाथ नव्याने होत असणारी ग्रंथवाढ यावर अतिशय यथायोग्य उत्तर म्हणजे ई-माहितीसाधने वाढविणे हा होय. आजचा वाचक ग्रंथालयावर अवलंबून न राहता स्वतः घरी बसून इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून आपणास हवी असलेली माहिती मिळवत आहे. पुस्तके व ई-माहिती साधने यांच्या वापराबद्दल वाचकामध्ये मतभेद दिसून येतात. आजही काही वाचक माहिती मिळवण्यासाठी पुस्तकावर अवलंबून असलेली दिसून येतात तर काही वाचक हे इंटरनेटच्या माध्यमातून ई-माहिती साधना धारे आपली बौद्धिक गरज भागवत असलेली दिसून येतात. माझ्या मते माध्यम हे पुस्तके किंवा ई-माहिती साधने असे कोणतेही असले तरी वाचकांनी आपला वाचन धर्म पाळला पाहिजे.
समाजात व शैक्षणिक संकुलात कोणताही कार्यक्रम, उपक्रम राबवत असताना पुष्पगुच्छ भेट न देता एक पुस्तक भेट स्वरूपात द्यावीत. लोकांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने संवाद, परिसंवाद, लेखकाचे मनोगत असे कळ कार्यक्रम घडवून आणणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी व वाचकांकडून बुक टॉक स्पर्धा, मला आवडलेला ग्रंथ वाचन स्पर्धा अशा स्वरूपातील स्पर्धा आयोजित करून वाचनाचे व एकंदरीत पुस्तकांचे महत्त्व समाजात रुजवणे आवश्यक आहे. पुस्तकाप्रमाणेच वाचकांनी ई-माहिती साधनांचा वापर वाढवून सध्याच्या स्पर्धेचे युगात माहितीची मोठ्या प्रमाणात व जलद गतीने देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. यासाठी प्रकाश काकडून व ग्रंथपालन व्यवसायिकांकडून वाचकांना ई-माहितीसाधनाचा योग्य वापर यावर वेळोवेळी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.आज कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशाच्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध माहिती साठ्यावर अवलंब असलेली दिसून येते. त्यामुळे माहिती भिमुख समाज बनविण्यासाठी पुस्तकासमवेत ई-माहिती साधनाचे वाचन वाचकांकडून मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने जागतिक पुस्तक दिन साजरा होईल.
No comments:
Post a Comment