Monday, August 12, 2024

डॉ. एस. आर. रंगनाथान

  

डॉ. शियाली रामामृत रंगनाथन 

(डॉ. एस. आर. रंगनाथान )

डॉ. एस. आर. रंगनाथन यांना भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते. तसेच आजचा 12 ऑगस्ट दिवस त्यांचा जन्मदिन हा ग्रंथपाल दिन म्हणूनही साजरा केला जातो. या ग्रंथपाल दिनानिमित्त डॉ. एस आर रंगनाथन यांच्या विषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी सदरील ब्लॉग पोस्टची निर्मिती करण्यात आलेली आहे. 

डॉ. एस आर रंगनाथन यांनी मांडलेली 1931 मध्ये ग्रंथालय शास्त्राची पंचसूत्री खालीलप्रमाणे मांडली 

१. ग्रंथ हे उपयोगी असतात
२. प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे
३. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे
४. वाचकांचा वेळ वाचला पाहिजे
५. ग्रंथाली ही वर्धिष्णू  संस्था आहे

दरील पंचसूत्री १९३१ मध्ये प्रकाशित झालेले असली तरीही आजही डिजिटल युगामध्ये या पंचसूत्रीचा विचार करूनच ग्रंथालयातील सेवा सुविधांमध्ये बदल होत असलेला दिसून येतो. या पंचसूत्रेत आजच्या इंटरनेट व माहिती युगात फक्त ग्रंथाची जागा माहितीने घेतली आहे. वाचक हा माहितीचा शोध प्रक्रियेत पूर्णतः व्यस्त झालेला दिसून येतो. यामुळे या पंचसूत्रीचे आजच्या माहिती व इंटरनेट युगानुसार खालील प्रमाणे बदल झालेला दिसून येतो.

१. माहिती ही उपयोगाची असते
२. प्रत्येक माहितीला वाचक मिळाला पाहिजे
३. प्रत्येक वाचकाला त्याची माहिती मिळाली पाहिजे
४. माहिती शोध प्रक्रियेत वाचकांचा वेळ वाचवला पाहिजे.
५. माहिती ही नेहमी वृद्धिगत होत असते.

डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे योगदान आजही ग्रंथालय व्यवसायिकांना प्रेरणा देणारे आहे. तसेच वाचकाचे समाधान हेच अंतिम ध्येय लक्षात ठेवून ग्रंथालय व्यवसायिकांनी आपले कार्य  पडले पाहिजे हा मौलिक संदेश डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी सर्व ग्रंथालय सेवकांना दिला आहे असे मला वाटते. 

डॉ. एस. आर. रंगनाथन इंटरनेटवरील निवडक माहिती 

रंगनाथन, शियाळी रामामृत - मराठी विश्वकोश

एस आर रंगनाथन - hi.wikipedia.org

S. R. Ranganathan - wikipedia 

डॉ एस आर रंगनाथन - lispedia.com 


निवडक लेख 

डॉ. बी. आर. लोकलवार - लोकराज्य दि. १२/०८/२०२३ 


ग्रंथालय शास्त्राचे पाच सिद्धांत’ - dnyantarangini.com

ग्रंथालय चळवळीचे जनक - maharashtratimes.com

Five Laws of Library Science - .librarianshipstudies.com 



YouTube Video 
















No comments:

Post a Comment