Friday, April 24, 2026

Current Awareness Service - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (ई-बुक)

      


 

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट ‘पुस्तक प्रकाशन’ हे आहे. या उद्दिष्टानुसार साहित्य, संस्कृती, कला आणि इतिहास या विषयांवर वैचारिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक तसेच वाङ्मयीन संशोधनपर अशा विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण व मौलिक ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले जातात. मंडळाच्या संकेतस्थळावर (https://sahitya.marathi.gov.in/) नवनवीन ग्रंथ ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून दिले जात असून ते पानोपानी वाचता येतात. मराठी रसिक वाचकांसाठी ही एक प्रकारची ज्ञानमेजवानीच आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून नव्याने प्रकाशित झालेल्या ई-बुक्सची माहिती ‘Current Awareness Service’द्वारे वाचकांपर्यंत पोहोचवली जात आहे.

एप्रिल 2026 - (New Post)  
















Sunday, April 12, 2026

सतत अभ्यास अभियान दिन

 

धारूर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या ग्रंथालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी “१८ तास सतत अभ्यास अभियान दिन” विविध शैक्षणिक, वाचनप्रेरक व तंत्रज्ञानाधारित उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. 



वर्तमानपत्रातील बातमी 

 

 प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते सतत अभ्यास अभियान दिन कार्यक्रमाची फीत कापून सुरुवात 

ग्रंथप्रदर्शन व सामुहिक वाचन 

 

ग्रंथपाल डॉ. गोपाळ सगर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी इंटरनेट वरील निवडक संकेत स्थळे , प्रबंध , वर्तमानपत्रातील लेख , Videos इ. चे ग्रंथालय ब्लॉगद्वारे ई-माहितीच्या स्वरुपात प्रसारण करण्यात आले. 

 
महाविद्यालयाचे विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना 


 

 प्रमुख मार्गदर्शक प्रा. नागोराव वाघमारे - विषय - ग्रंथ , वाचन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर 


 

प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे - अध्यक्षीय समारोप 

 

 

 

 

 

उत्कृष्ट वाचक स्पर्धेत यशस्वी वाचकांना ग्रंथ भेट व प्रमाणपत्र देऊन गोरविण्यात आले.


या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 


Saturday, April 4, 2026

मराठी कादंबऱ्या - सारांश

 


 

 1. अग्निपंख - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

 2. अमृतवेल - वि. स. खांडेकर

 3. गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे

 4. गोलपिठा - नामदेव ढसाळ

5. झाडाझडती  - विश्वास पाटील

6. झोंबी - आनंद यादव

7. नटसम्राट - विष्णू वामन शिरवाडकर

8. पानिपत - विश्वास पाटील

9. फकीरा - अण्णाभाऊ साठे

10. बलुतं - दया पवार

11. मृत्युंजय - शिवाजी सावंत

12. ययाती - वि. स. खांडेकर

13. वारणेचा वाघ - अण्णाभाऊ साठे

14. स्वामी - कादंबरी रणजीत देसाई

15. संभाजी - विश्वास पाटील

16. श्रीमान योगी - रणजीत देसाई

17. श्यामची आई - साने गुरुजी

18. शाळा - मिलिंद बोकील

19. महाश्वेता - सुधा मूर्ती

20. महानायक - विश्वास पाटील

21. माऊली - आनंदी यादव

22. मायबोली - मनोहर सालफळे

23. मृगजळ - सुनील डोईफोडे

24. मृत्युंजय - शिवाजी सावंत

25. बॅरिस्टर - जयवंत दळवी

26. छावा - शिवाजी सावंत

27. चिखलातील कमळ - अण्णाभाऊ साठे

28. चंदन - अण्णाभाऊ साठे

29. चक्रव्यू डॉ. निलेश राणा

30. चांगुना - प्रल्हाद केशव अत्रे