महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट ‘पुस्तक प्रकाशन’ हे आहे. या उद्दिष्टानुसार साहित्य, संस्कृती, कला आणि इतिहास या विषयांवर वैचारिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक तसेच वाङ्मयीन संशोधनपर अशा विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण व मौलिक ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले जातात. मंडळाच्या संकेतस्थळावर (https://sahitya.marathi.gov.in/) नवनवीन ग्रंथ ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून दिले जात असून ते पानोपानी वाचता येतात. मराठी रसिक वाचकांसाठी ही एक प्रकारची ज्ञानमेजवानीच आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून नव्याने प्रकाशित झालेल्या ई-बुक्सची माहिती ‘Current Awareness Service’द्वारे वाचकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
एप्रिल 2026 - (New Post)

No comments:
Post a Comment