https://upload.wikimedia.org/wikipedia/en/6/6e/INFLIBNET_Centre_logo.png
वाचकांसाठी INFLIBNET चे मोफत उपक्रम
INFLIBNET चा Full form Information and Library Network असा आहे. हे एक स्वायत्त आंतरविद्यापीठीय केंद्र असून विद्यापीठ अनुदान आयोग (शिक्षण मंत्रालय , भारत सरकार) यांच्या अंतर्गत कार्यरत आहे. INFLIBNET हे माहितीचा वापर मोठ्या प्रमाणात होण्यासाठी व तसेच संशोधन , अध्ययन व शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अविरत कार्य करीत असते. मुख्यत्वे संशोधन कार्याचे जतन, संवर्धन व प्रसारण सदरील संस्थेकडून केले जाते.
सर्व शैक्षणिक भागधारकांना मोफत स्वरूपात माहिती देण्यासाठी सदरील संस्थेने खालील उपक्रम सुरु केले आहे. या उपक्रमातील माहिती आपण मोफत स्वरूपात पेज टू पेज वाचू शकता , डाउनलोड करू शकता . सदरील उपक्रमातील माहिती हि अद्ययावत व विश्वसनीय स्वरूपाची असल्यामुळे संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी हे एक विश्वसनीय माहितीचे दालनच आहे. यामुळे सर्व वाचकांनी विशेषतः संशोधकांनी सदरील माहितीचा जास्तीत जास्त वापर करावा व या उपक्रमाची माहिती आपणास व्हावी या उद्देशाने सदरील ब्लॉगपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे .
Website address - https://www.inflibnet.ac.in/
INFLIBNET चा Homepage वर Major Activity - Open Access Initiatives मध्ये खालील उपक्रमाविषयी माहिती दिली आहे.
Open Access Initiatives
1. Shodhganga - Home Page
संशोधकांसाठी shodhganga हि एक संजीवनी स्वरूपात कार्यरत आहे . संशोधकाला आपल्या संशोधन विषयावर उपलब्ध संशोधन थिसीस हे पेज टू पेज पाहता येतात . विशेषतः एका निर्देशामध्ये सदरील थिसीस उपलब्ध असल्यामुळे ते शोधण्यास सोपे आहे. विशिष्ट प्रकरणातील विशिष्ट माहिती कमीत कमी वेळात पाहता येते . भारतामधील जवळपास सर्व विद्यापीठे आपल्याकडील थिसीस हे शोधगंगा वर उपलब्ध करून ठेवत असल्यामुळे संशोधकांचा वेळ , श्रम व आर्थिक बचत होत आहे. सदरील संशोधन प्रकल्प हे संशोधकास विद्यापीठांनुसार , मार्गदशकानुसार , संशोधकांनुसार, विषयानुसार, विशिष्ट संकल्पनेनुसार पाहता येतात . सद्यपरिस्थितीत 327336 एवढा थिसीस चा संग्रह शोधगंगा संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
2. Shodhganghotri - Home Page
शोधगंगोत्री हा उपक्रम नवीन संशोधकांसाठी संशोधनाचा विषय ठरवण्यासाठी अतिशय मार्गदर्शक आहे. शोधगंगोत्री संकेतस्थळावर भारतामधील संशोधकांचे संशोधन आराखडे , प्रकल्प आराखडे पाहता येतात व ते डाउनलोड करू शकतात . सदरील संशोधन आराखडे , संशोधन प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप हे संशोधकास विद्यापीठांनुसार , मार्गदशकानुसार , संशोधकांनुसार, विषयानुसार, विशिष्ट संकल्पनेनुसार पाहता येतात .
3. Institutional Repository - Home Page
Institutional Repository या उपक्रमाद्वारे INFLIBNET चा संस्थेतील प्रकाशाने वाचकांना उपलध करून दिली आहेत. यामध्ये वाचकांना INFLIBNET in Press and Media, InFLIBNET Conventin Proceedings व INFLIBNET Publications हि संस्थेची माहिती साधने Author, Subject व Date issued व च्या माध्यमातून पाहता येतात .
4. INFOPORT - Home Page
INFOPORT हा Indian Electronic Resource चा Subject Gateway असून यामध्ये वाचकांसाठी भारतातील Online Scholarly Content उपलब्ध आहेत .
यामध्ये वाचकांना वर्णानुक्रमे , दशांश वर्गीकरण तालिका संहितेनुसार माहितीच शोध घेता येतो . सदरील उपक्रमामध्ये खालील माहितीसाधेने आपणास पाहता येतात .
5. Research Project Database - Home Page
Research Project Database या उपक्रमाद्वारे INFLIBNET ने संशोधनाचा database वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे . UGC, ICMR, ICAR, DST व DBT या संस्थेने funded केलेल्या प्रोजेक्ट्स ची तपशीलवार माहिती सदरील database मध्ये उपलब्ध आहे.
वाचकांनी INFLIBNET च्या सर्व Open Access Initiatives चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा !
Santosh lamb 8788=79467
ReplyDelete