स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी , अभ्यासकांना सूचित करण्यात येते कि, महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालया मार्फत सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा हि प्रत्येक महिन्यात एक वेळेस घेण्याचे आयोजिले आहे. सदरील परीक्षा हि ग्रंथालय ब्लॉग च्या माध्यमातून Google Form आधारे घेण्यात येईल. यामुळे हि परीक्षा अभ्यासकांना कोठेही इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे (संगणक , लॅपटॉप , मोबाईल इ. ) देता येईल.
अभ्यासकांनी खालील लिंक ला क्लिक करून परीक्षा द्यावी
https://forms.gle/Ugy7h3WvjXBYHTgg8
या उपक्रमाद्वारे आपणास स्पर्धा परीक्षेवरील online स्वरूपातील वाचनसाहित्य उपलब्ध करून दिले जाईल . तसेच प्रत्येक महिन्यात ५० गुणांची सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा Google form च्या माध्यमातून घेतली जाईल. सदरील परीक्षा दिल्यानंतर View Result मध्ये आपणास एकूण किती गुण मिळाले व अचूक उत्तरे कोणती आहेत हे समजून येईल. सदरील सराव सामान्य ज्ञान चाचणी परीक्षेमुळे आपणास स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत होईल.
अभ्यासकांनी सदरील परीक्षेत आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवावा. व यासंदर्भात काही समस्या येत असतील अथवा आपली स्पर्धा परीक्षेसंदर्भात काही सूचना असतील, वाचनसाहित्याची मागणी असेल तर कृपया आपली सदरील मागणी खालील ई-मेल वर पाठवावी .
1. acscdlibrary20@gmail.com ,
2. librarian.acsckilledharur@gmail.com
MPSC Website संदर्भात माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission ) ची वेबसाइट वरील माहिती योग्यरीत्या कशी पाहावी यासंदर्भात अभ्यासकांना खालील माहितीचा उपयोग होईल.
प्रथमतः च्या होमपेज साठी खालील लिंक ला क्लिक करावे
सदरील होमपेज खालील स्वरूपाचे दिसेल
छान
ReplyDelete