Thursday, December 30, 2021

करिअर कट्टा व नौकरी संदर्भ प्रसिद्ध जाहिराती

 


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय


करिअर कट्टा सदरविषयी माहिती 
१. करिअर कट्टा हे सदर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाईल.
२. सदरील सदरात स्पर्धा परीक्षेविषयी एक सामान्य चाचणी परीक्षा सर्वांसाठी उपलब्ध होईल.
३. सदरामध्ये नौकरी संदर्भ प्रसिद्ध जाहिरातीची ऑनलाईन माहिती दिली जाईल.
४. स्पर्धा परीक्षेविषयी, अभ्यासक्रमाविषयी , संबंधित माहितीसाधने ऑनलाईन पुरवठा केला जाईल.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी , अभ्यासकांना ऑनलाईन माहितीसेवेसाठी आपले प्रश्न , आवश्यक माहिती , परीक्षेसंदर्भातील माहितीसाठी खालील ई -मेल वर संपर्क साधावा.  

1. acscdlibrary20@gmail.com , 

2. librarian.acsckilledharur@gmail.com.


1. सराव प्रश्नावली - डिसेंबर २०२१

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी , अभ्यासकांना सूचित करण्यात येते कि, महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालया मार्फत सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा हि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाईल. सदरील  परीक्षा हि ग्रंथालय ब्लॉग च्या माध्यमातून Google Form आधारे घेण्यात येईल. यामुळे हि परीक्षा अभ्यासकांना कोठेही इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे (संगणक , लॅपटॉप ,  मोबाईल इ. ) देता येईल. 

अभ्यासकांनी खालील लिंक ला क्लिक करून परीक्षा द्यावी. 

https://forms.gle/Ugy7h3WvjXBYHTgg8


या उपक्रमाद्वारे आपणास स्पर्धा परीक्षेवरील online स्वरूपातील  वाचनसाहित्य उपलब्ध करून दिले जाईल . तसेच प्रत्येक महिन्यात ५० गुणांची  सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा Google  form च्या माध्यमातून घेतली जाईल. सदरील परीक्षा दिल्यानंतर View Result  मध्ये आपणास एकूण किती गुण मिळाले व अचूक उत्तरे कोणती आहेत हे समजून येईल. सदरील सराव सामान्य ज्ञान चाचणी परीक्षेमुळे आपणास स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत होईल. 

अभ्यासकांनी सदरील परीक्षेत आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवावा. व यासंदर्भात काही समस्या येत असतील अथवा आपली स्पर्धा परीक्षेसंदर्भात काही सूचना असतील,  वाचनसाहित्याची मागणी असेल तर कृपया आपली सदरील मागणी खालील ई-मेल वर पाठवावी . 


2. नौकरी संदर्भ प्रसिद्ध जाहिराती

नॅशनल हेल्थ मिशनने (NHM) सायकोलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, स्पेशलएज्युकेटर, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, रेफ्रिजरेटरमेकॅनिक, फार्मासिस्ट, कुक-कम-केअर टेकर, समुपदेशक, स्तनपान समुपदेशक, ऑडिओमेट्रीशियन, प्रशिक्षक या पदांसाठी भरतीसाठी अधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयातील Placement Cell चा  ब्लॉगपोस्ट पहा 

https://acscdplacementcell.blogspot.com/2021/12/blog-post.html


सदरील जाहिरात पाहण्यासाठी खालील स्टेप्स पाहाव्यात 

अधिकृत साइट : http://www.nrhmhp.gov.in/







3. PSI स्पर्धा परीक्षेविषयी माहिती


PSI परीक्षेचा मराठीतून अभ्यासक्रम







Thursday, December 23, 2021

वाचकांसाठी QR Code वर आधारीत उपस्थिती व अन्य माहितीसेवा





QR Code म्हणजे Quick Response Code याद्वारे आपण वाचकांना , विद्यार्थ्यांना कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती दिली जाते. सदरील QR Code चा वापर आपण दैनंदिन जीवनात पाऊल  करीत असतो जसे कि आपण मॉल, शॉप मध्ये खरेदी करीत असताना, Phone  Pay अँपवरून पैसाची देवाणघेवाण करण्यासाठी, Registration साठी , पुस्तकांमध्ये,  कमी वेळेत जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी इ. यासंदर्भात आपण अलीकडील काळात सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रंजितसिंह डिसले याना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज पुरस्कार सुद्धा क्युआर कोडेड पुस्तकांसंदर्भात देण्यात आला. 


QR code चे महत्व लक्षात घेऊन आपल्या महाविद्यालयीन ग्रंथालयाने वाचकांसाठी QR Code वर आधारीत उपस्थिती नोंदविणे व अन्य माहितीसेवा कमीत कमी वेळेत वाचकांपर्यंत पोहचिवण्यासाठी ग्रंथालयात QR Code चे उपयोजन केलेले आहे. सर्व वाचकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा हि विनंती.   

QR code  चा वापर करून आपली उपस्थिती कशी नोंदवावी 

१. आपल्या मोबाईल मध्ये Google Play Store अँप मधून बारकोड स्कॅनर डाउनलोड करावे .
२. सदरील बारकोड स्कॅनर  वरून Library Attendance चा QR code स्कॅन करावा .
३. QR code स्कॅन केल्यानंतर Open Browser मधून लिंक उघडावी. 
४. आपणास Google Form दिसेल .
५. सदरील  Google Form माहिती भरावी व submit करावे.
६. आपण सबमिट बटन प्रेस केल्याबरोबरच आपली उपस्थिती ऑनलाईन स्वरूपात नोंदवली जाईल.


 QR code आधारीत ग्रंथालयीन माहितीसेवा

आपल्या महाविद्यालयीन ग्रंथालयात QR code वर आधारीत खालील ग्रंथालयीन माहितीसेवा
उपलब्ध आहेत. 

१. WebOPAC 
ग्रंथालयात WebOPAC चा QR code  उपलब्ध असून सदरील सेवेमार्फत आपण महाविद्यालयीन ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथाचा लेखक , शीर्षक , विषय , प्रकाशक इत्यादी नुसार ग्रंथाचा शोध घेता येते. पूर्वीच्या काळी ग्रंथ शिधण्यासाठी तालिकापात्राचा वापर केला जात असत यामध्ये पुष्कळ वेळ वाया जात होता परंतु आपण या WebOPAC सेवेच्या माध्यमातून काही सेकंदामध्ये ग्रंथालयात पुस्तक उपलब्ध आहे कि नाही ते आपल्या मोबाईल वरती पाहू शकतो.    

२. Online E -resources 

ग्रंथालयात  Online E -resources साठी N-List Consortia व विद्यापीठीय ग्रंथालयाकडून Remote Access असे दोन QR code  उपलब्ध असून 
     आपणास मोबाईल  वर Online E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. N-List Consortia वापरण्यासाठी User ID व Password माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदरील माहिती दालनाचा उपभोग घेण्यासाठी आपण खालील दिलेल्या Google form वर क्लिक करून सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. 

नाव नोंदणी साठी   N-List   येथे क्लिक करा

 3. Library Blog

Library Blog च्या माध्यमातून सर्व वाचकांना Selective Dissemination Service , Current Awareness Service  व   Reference Service हि  माहितीसेवा Online स्वरूपात देता येते सर्व माजी विद्यार्थी , पालक व all academic stakeholders विनंती आहे कि, त्यांनी सदरील माहितीच्या अपडेट साठी खालील WhatsApp Group मध्ये सहभागी व्हावे. 

Click Here for Join WhatsApp Group

Library Blog Link Click Here to Visit Library Blog 

   सदरील लिंक हि महाविद्यालयाच्या website वर हि उपलब्ध आहे 

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील सर्व ब्लॉगपोस्ट पाहण्यासाठी Click Here


4. Feedback Form

ग्रंथालयात Feedback चा QR code  उपलब्ध असून सदरील सेवेमार्फत वाचकांना कमीत कमी वेळेत Feedback Form भरता येतो.  


5. Requisition Form

       ग्रंथालयात Feedback चा QR code  उपलब्ध असून सदरील सेवेमार्फत वाचकांना विनाविलंब ग्रंथाची मागणी ऑनलाईन स्वरूपात  करता येते. 

आपण QR code विषयी आणखीन जाणून घेण्यासाठी खालील youtube चे video पहावेत 
 











 


Sunday, December 12, 2021

मा. शरद पवार यांच्याशी संबंधित निवडक माहितीस्रोत

 


(Reference - https://indiagroundreport.com/wp-content/uploads/2021/11/aa-Cover-3coomq3l3744re2t8kqmlvnpc3-20190929055044.Medi_.jpeg )



निवडक संकेतस्थळावरील माहिती









निवडक ई-बुक 






निवडक पीएच.डी. प्रबंध 



निवडक You Tube Video








 



Monday, December 6, 2021

Current Awareness Service - मराठी ई-बुक (नोव्हेंबर २०२१)

 

(Reference -  https://marathi.gov.in/महाराष्ट्र-राज्य-साहित्य/ )

मराठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. 
 

सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते.  हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


वाचकांना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते . सदरील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती वाचकांना आपण सदरील ब्लॉगच्या माध्यमातून देत आहोत. 


या संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती प्रचलित जागरूकता सेवेच्या (Current Awarness Service ) माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रंथालयाद्वारे सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती करण्यात येत आहे . 


नोव्हेंबर  २०२१ - (New Post) 



Friday, December 3, 2021

शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र दि. ०५/१२/२०२१

 



PDF CopyClick Here

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , किल्लेधारूर व मॉंडर्न कॉलेज ऑफ कला , विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालय , पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. ०५/१२/२०२१ रोजी  सकाळी ठीक ११.०० वा." Role of Non-teaching Staff in Effective Administrative Practices " सदरील विषयावर शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले आहे.


सदरील चर्चासत्रात नाव नोंदणीसाठी - Click Here

Whatsapp Group सहभागासाठी - Click Here , Click Here

YouTube Link चर्चासत्रात सहभागासाठी - Click Here


सदरील राष्ट्रीय चर्चासत्रात देशातील सर्व महाविद्यालयीन शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे दोनही महाविद्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.


आपले विनीत 

Organized By 

Administrative Office and IQAC of  both the Colleges


Chief Organizers 

Dr. Sanjay S. Kharat              Dr. Shivdas Z. Shirsath 

Principal                                                    Principal
Modern College of Arts, Science             Arts, Commerce and Science College,
and Commerce College,                           Killed-Dharur, Dist. Beed. 
Ganeshkhind, Pune.  


Organizing Committee 

Mr. Shialesh B. Pagade     Mr. Dhananjay S. Solanke    Mr. Prakash D. Renuse
  (Co-convener)                         (Convener)                            (Coordinator)                                      
Mob.  9881144624                   Mob.  9767438911







Tuesday, November 30, 2021

करिअर कट्टा (सराव प्रश्नावली - नोव्हेंबर २०२१)

 


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी , अभ्यासकांना सूचित करण्यात येते कि, महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालया मार्फत सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा हि प्रत्येक महिन्यात एक वेळेस घेण्याचे आयोजिले आहेसदरील  परीक्षा हि ग्रंथालय ब्लॉग च्या माध्यमातून Google Form आधारे घेण्यात येईल. यामुळे हि परीक्षा अभ्यासकांना कोठेही इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे (संगणक , लॅपटॉप ,  मोबाईल इ. ) देता येईल. 


अभ्यासकांनी खालील लिंक ला क्लिक करून परीक्षा द्यावी 


https://forms.gle/Ugy7h3WvjXBYHTgg8


या उपक्रमाद्वारे आपणास स्पर्धा परीक्षेवरील online स्वरूपातील  वाचनसाहित्य उपलब्ध करून दिले जाईल . तसेच प्रत्येक महिन्यात ५० गुणांची  सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा Google  form च्या माध्यमातून घेतली जाईल. सदरील परीक्षा दिल्यानंतर View Result  मध्ये आपणास एकूण किती गुण मिळाले व अचूक उत्तरे कोणती आहेत हे समजून येईल. सदरील सराव सामान्य ज्ञान चाचणी परीक्षेमुळे आपणास स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत होईल. 


अभ्यासकांनी सदरील परीक्षेत आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवावा. व यासंदर्भात काही समस्या येत असतील अथवा आपली स्पर्धा परीक्षेसंदर्भात काही सूचना असतील,  वाचनसाहित्याची मागणी असेल तर कृपया आपली सदरील मागणी खालील ई-मेल वर पाठवावी . 

1. acscdlibrary20@gmail.com , 

2. librarian.acsckilledharur@gmail.com




MPSC Website संदर्भात माहिती 


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission ) ची वेबसाइट वरील माहिती योग्यरीत्या कशी पाहावी यासंदर्भात अभ्यासकांना खालील माहितीचा उपयोग होईल. 


प्रथमतः च्या होमपेज साठी खालील लिंक ला क्लिक करावे

https://mpsc.gov.in/


सदरील होमपेज खालील स्वरूपाचे दिसेल



सदरील होमपेज च्या वरील भागात खालीलपैकी महत्वाचे तीन पोर्टल दिसून येतील. 
1. About MPSC 2. Candidate Information 3. Online Facilities 


1. About MPSC मध्ये MPSC बद्दल , त्यांच्या वार्षिक अहवालाबाबत , Rules & Regulation , त्यांच्या बैठकाबाबत सविस्तर माहिती मिळते. 

 2. Candidate Information या पोर्टल मध्ये विविध पदाविषयी , परिवक्षेविषयी , जुन्या प्रश्नपत्रिकांविषयी माहिती मिळते.

3. Online Facilities -  विद्यार्थ्यांना Online Application , Mark sheet , Upload document याविषयी माहिती मिळते . सदरील पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांना लॉगिन करण्याची सुविधा उपलब्ध आहे .



सदरील होमपेज च्या मध्यभागात खालीलपैकी महत्वाचे तीन पोर्टल दिसून येतील. 



सदरील होमपेज च्या खालील भागात  इतर महत्वाच्या लिंक विषयी माहिती दिली आहे 











  

Thursday, November 25, 2021

करिअर कट्टा - YouTube Channel Subscribe करून आपला सहभाग नोंदवावा

 


(Image Reference - https://careerkatta.mitsc.co.in/)


महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग ,महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व श्री शाहू मंदिर महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा आयोजित


26 नोव्हेंबर 2021 रोजी संविधानाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त "संविधान दिन" मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे या उपक्रमांमध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे ही विनंती. सदर उपक्रमांमध्ये 


https://www.youtube.com/channel/UChvqVo1cE_PmXE19a4ye1gA


 वरील लिंक ला क्लिक केल्यास खालील YouTube Channel दिसेल 



वरील प्रमाणे Subscribe शब्दावर केल्यानंतर आपणास subscribed हा शब्द दिसेल व तसेच Subscription  added अशी सूचना दिसेल तेंव्हाच  आपला सहभाग नोंदविला जाईल.





या युट्युब चैनल वरून सकाळी 11.00 वाजता लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी खालील दोन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.


1. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याकडून 25 नोव्हेंबर पूर्वी सदर यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून घ्यावे.

2. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये स्वतःचे नाव व महाविद्यालयाचे नाव नोंदविणे अपेक्षित आहे. तरी आपणास विनंती अशी की भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संविधानाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे ही विनंती.



सदरील YouTube Channel  वरील Video पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करावे 

https://www.youtube.com/c/uvajagar/videos



सदरील YouTube Channel  वरील Playlist पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करावे 










Friday, November 19, 2021

मराठी ई-बुक डाउनलोड - CAS

 

(Reference -  https://marathi.gov.in/महाराष्ट्र-राज्य-साहित्य/ )

मराठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. 
 

सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते.  हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


वाचकांना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते . सदरील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती वाचकांना आपण सदरील ब्लॉगच्या माध्यमातून देत आहोत. 


या संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती प्रचलित जागरूकता सेवेच्या (Current Awarness Service ) माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रंथालयाद्वारे सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती करण्यात येत आहे . 


नोव्हेंबर  २०२१ - (New Post) 



ऑक्टोबर  २०२१ - (New Post) 









‘महाराष्ट्राचे शिल्पकार कृष्णराव पांडुरंग भालेकर’

Friday, November 12, 2021

Open Access Initiatives of INFLIBNET

 https://upload.wikimedia.org/wikipedia/en/6/6e/INFLIBNET_Centre_logo.png



वाचकांसाठी INFLIBNET चे मोफत उपक्रम 

INFLIBNET चा  Full form Information and Library Network असा आहे. हे एक स्वायत्त आंतरविद्यापीठीय केंद्र असून विद्यापीठ अनुदान आयोग (शिक्षण मंत्रालय , भारत सरकार) यांच्या अंतर्गत कार्यरत आहे.  INFLIBNET हे माहितीचा वापर  मोठ्या प्रमाणात होण्यासाठी व तसेच  संशोधन , अध्ययन व शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अविरत कार्य करीत असते. मुख्यत्वे संशोधन कार्याचे जतन, संवर्धन व प्रसारण सदरील संस्थेकडून केले जाते. 

सर्व शैक्षणिक भागधारकांना मोफत स्वरूपात माहिती देण्यासाठी सदरील संस्थेने खालील उपक्रम सुरु केले आहे. या उपक्रमातील माहिती आपण  मोफत स्वरूपात पेज टू पेज वाचू शकता , डाउनलोड करू शकता . सदरील उपक्रमातील माहिती हि अद्ययावत व विश्वसनीय स्वरूपाची असल्यामुळे संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी हे एक विश्वसनीय माहितीचे दालनच आहे. यामुळे सर्व वाचकांनी विशेषतः संशोधकांनी सदरील माहितीचा जास्तीत जास्त वापर करावा व या उपक्रमाची माहिती आपणास व्हावी या उद्देशाने सदरील ब्लॉगपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे .


INFLIBNET Website पाहण्यासाठीClick Here

Website address - https://www.inflibnet.ac.in/  


INFLIBNET चा  Homepage वर Major Activity - Open Access Initiatives मध्ये खालील उपक्रमाविषयी  माहिती दिली आहे. 






Open Access Initiatives


1. Shodhganga - Home Page

संशोधकांसाठी shodhganga हि एक संजीवनी स्वरूपात कार्यरत आहे . संशोधकाला आपल्या संशोधन विषयावर उपलब्ध संशोधन थिसीस हे पेज टू पेज पाहता येतात . विशेषतः एका निर्देशामध्ये सदरील थिसीस उपलब्ध असल्यामुळे ते शोधण्यास सोपे आहे. विशिष्ट प्रकरणातील विशिष्ट माहिती कमीत कमी वेळात पाहता येते . भारतामधील जवळपास सर्व विद्यापीठे आपल्याकडील थिसीस हे शोधगंगा वर उपलब्ध करून ठेवत असल्यामुळे संशोधकांचा वेळ , श्रम व आर्थिक बचत होत आहे. सदरील संशोधन प्रकल्प हे संशोधकास विद्यापीठांनुसार , मार्गदशकानुसार , संशोधकांनुसार, विषयानुसार, विशिष्ट संकल्पनेनुसार पाहता येतात . सद्यपरिस्थितीत 327336 एवढा थिसीस चा संग्रह शोधगंगा संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   




2. Shodhganghotri - Home Page

शोधगंगोत्री हा उपक्रम नवीन संशोधकांसाठी संशोधनाचा विषय ठरवण्यासाठी अतिशय मार्गदर्शक आहे. शोधगंगोत्री संकेतस्थळावर भारतामधील संशोधकांचे संशोधन आराखडे , प्रकल्प आराखडे पाहता येतात व ते डाउनलोड करू शकतात . सदरील संशोधन आराखडे , संशोधन प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप हे संशोधकास विद्यापीठांनुसार , मार्गदशकानुसार , संशोधकांनुसार, विषयानुसार, विशिष्ट संकल्पनेनुसार पाहता येतात . 




3. Institutional Repository - Home Page

Institutional Repository या उपक्रमाद्वारे  INFLIBNET चा संस्थेतील प्रकाशाने वाचकांना उपलध करून दिली आहेत. यामध्ये वाचकांना INFLIBNET in Press and Media, InFLIBNET Conventin Proceedings  INFLIBNET Publications हि संस्थेची माहिती साधने Author, Subject व Date issued व च्या माध्यमातून पाहता येतात .  


 



4. INFOPORT - Home Page

INFOPORT   हा Indian Electronic Resource  चा  Subject Gateway असून यामध्ये वाचकांसाठी  भारतातील Online Scholarly Content उपलब्ध आहेत . 


यामध्ये वाचकांना वर्णानुक्रमे , दशांश वर्गीकरण तालिका संहितेनुसार माहितीच शोध घेता येतो . सदरील उपक्रमामध्ये खालील माहितीसाधेने आपणास पाहता येतात .


5. Research Project Database - Home Page

Research Project Database या उपक्रमाद्वारे INFLIBNET ने  संशोधनाचा database वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे .  UGC, ICMR, ICAR, DST व DBT या संस्थेने funded केलेल्या प्रोजेक्ट्स ची तपशीलवार माहिती सदरील database मध्ये उपलब्ध आहे. 






वाचकांनी INFLIBNET च्या सर्व Open Access Initiatives चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा !


Thursday, November 4, 2021

दिवाळी अंक - सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

(http://arti-katha.blogspot.com/2017/10/diwali-wishes-wallpaper-and-quotes.html)



वाचकांना दिवाळी अंक म्हंटल कि एक पर्वणीच ! पूर्वीच्या काळी दिवाळीत वाचक हे आपले बौद्धिक गरज , मनोरंजन इ. साठी  दिवाळी अंक खूप आवडीने वाचले जायचे . परंतु आजच्या डिजिटल युगात त्यांचे महत्व  या इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे कमी जरी वाटत असले तरी सदरील  दिवाळी अंक हे आपल्या समाजातील भाषा, संस्कृती जपण्याचे अविरत कार्य करीत आहेत. आजच्या कोरोना महामारीच्या काळात व माहितीतंत्रज्ञानाच्या युगात  दिवाळी अंकांनी आपले पारंपरिक स्वरूप बदलून डिजिटल स्वरूप अवलंबले आहे. यामुळे दिवाळी अंक हे आपण PDF स्वरूपात आपल्या घरी बसून मोबाईल वर वाचू शकता . वाचकांना  दिवाळी अंकाविषयी माहिती व जुने दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध करून द्यावीत या उद्देशाने सदरील ब्लॉगपोस्ट ची इनर्मिती करण्यात येत आहे . व तसेच सर्व वाचकांना हि दिवाळी ज्ञानसमृद्धी , उन्नत्ती  व भरभराटीची जावो हीच प्रार्थना! 

दिवाळी अंकाविषयी निवडक माहिती 










 जुने दिवाळी अंक वाचनासाठी भेट 










सर्व वाचकास पुनश्च दिवाळीच्या ज्ञानरूपी प्रकाशमय खूप खूप शुभेच्छा