Published on 01 Jan 2022
वाचकांना नवीन वर्षाच्या या ग्रंथ रूपाने खुप खुप शुभेच्छा देत आहे
नवीन वर्षाच्या प्रारंभी, आपल्यासारख्या सुजाण वाचकांच्या आशीर्वादाने, व लेखकांच्या योगदानाने E-book on "Impact of ICT in Teaching, Learning and Evaluation process" या संपादकीय ई-बुकचे प्रकाशन आज दिनांक 01 जानेवारी 2022 रोजी करीत आहोत.
महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त नवीन शैक्षणिक विषयावर विचारमंथन व्हावे व सदरील विचार मोफत सर्व स्वरूपात सर्व शैक्षणिक भागधारकांना वाचता यावेत यासाठी एका ई-बुक्सची निर्मिती करण्यात यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संपादकीय मंडळाने सदरील ई-बुक चे आज रोजी प्रकाशन केले आहे.
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व कोणाच्या महामारीत माहिती तंत्रज्ञानाचा अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनावर कसा प्रभाव पडला आहे हे जाणून घेण्यासाठी शिक्षण क्षेत्रातून सदरील विषयावरील लेख मागवण्यात आले, आपल्या विषयाशी सुसंगत व उत्कृष्ट लेखाची निवड करून सदरील ई-बुक हे आपल्या वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून देत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
सदर पुस्तक हे हर्षवर्धन प्रकाशकांकडून(ISBN सहित) प्रकाशित होत असल्यामुळे लेखकांना CAS अंतर्गत फायदा होईलच पण आपले विचार व योगदानाबाबत आम्ही आपले ऋणी आहोत.
वाचकांना नवीन वर्षाच्या या ग्रंथ रूपाने खुप खुप शुभेच्छा देत आहे 💐💐
Great Going...
ReplyDeleteHearty congratulations
ReplyDeleteCongratulations and thank you.
ReplyDeleteGreat initiative 👏 👍
ReplyDelete