Saturday, July 24, 2021

Mock Test - दिनांक २४.०७.२०२१ ते २८.०७.२०२१


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील मार्च / एप्रिल  2021 च्या जुलै / ऑगस्ट मध्ये  होणाऱ्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या  द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा दिनांक २९ जुलै २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. 

तरी संबंधित विद्यर्थानीं विद्यापीठाच्या सर्व सूचनांचे पालन करून दिनांक २४.०७.२०२१ ते २८.०७.२०२१ या दरम्यान (ऑनलाईन सराव) Mock Test  परीक्षा द्यावी. 


विद्यार्थ्यांना (Mock Test )ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात अडचणी दूर करण्यासाठी खालील प्राध्यापकांशी (I.T. Coordinator) संपर्क साधावा.


Mr. G. D. Sagar -  9881021569 , Mr. A. R. Gade - 8744879909.


B. A. -     Dr. D. M. Bharti -      9422353611, 
               Mr. G. D. Bavaskar - 9860213183.

B. Com. - Mr. V. S. Kumbhare - 9423373560,  
                    Dr. Bharat Pagare - 8788675929.

B.Sc. Dr. R. R. Bhosle - 8888639309,  
              Mr. A. R. Gade - 8744879909.
    

विद्यापीठाचे पत्र - Click Here



Mock Test

सदरील परीक्षा http:bamu.unionline.in  लिंक वर जाऊन देण्यात यावी .

परीक्षार्थ्यांनी खालील विडिओ मार्गदर्शनासाठी पहावा 
(https://youtu.be/b-grGUeVmRs ) 



विद्यापीठीय अधिकारी - संपर्क क्रमांक 

!!सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी शुभेच्छा!!








Friday, July 23, 2021

गुरु पौर्णिमेनिमित्त सर्व वाचकरूपी गुरुजनांना खूप शुभेच्छा !!

 

(Reference - https://tinyurl.com/yzk3p3hc )


गुरू गोविन्द दोऊ खड़े, काके लागूं पांय।
बलिहारी गुरू अपने गोविन्द दियो बताय।। 

- संत कबीरदास 

गुरू पौर्णिमा 

कबीर च्या वरील पंक्तीनुसार गुरुजन हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूंना अतिशय महत्व आहे. गुरूकडून आपण प्रेरणा, मार्गदर्शन घेत असतोच पण त्याप्रमाणे आचरणसुद्धा आपल्या वास्तविक जीवनामध्ये करीत असतो. एखाद्या गोष्टीचा संदर्भ जोडत असताना  आपल्या डोळ्यासमोर  आपले गुरु उभे राहत असतात. गुरु हि सर्वात मोठी शिदोरी आपण आपल्यासोबत नेहमी बाळगत असतो तसेच ज्ञान रूपात त्याचा थोडा थोडा विसर्ग हि करत असतोच. 

आजचा दिवस आपण आपल्या गुरुजनांना शुभेच्छा देऊन साजरा करीत असतो. आपल्या आयुष्यात लहानपणापासूनच अनेक गुरूंचा संपर्क येत असतो पण काही ठराविक गुरूच आपल्या विस्मरणात असतात . गुरूंचे  अनेक स्वरूप आपणास पाहावयास मिळतात पण माज्या मते ग्रंथसारखा मोठा गुरु या जगात दुसरा कोणताही नाही. 

ग्रंथातून आपण माहिती, ज्ञान हे मिळवतोच तसेच  ग्रंथ हे वाचकांच्या करमणुकीचे साधन आहे. माहितीची निर्मिती व माहितीचे प्रसारण हे ग्रंथातूनच होते. आज आपण माहिती व तंत्रज्ञाच्या युगात सर्वजण एका क्लीक वर एकत्र येत आहोत. या माहितीतंत्रज्ञांच्या युगात ग्रंथाचे रूपांतर हे इंटरनेट प्रमुखतः Google सारख्या search engine मध्ये झाले आहे. माहितीचे स्वरूप जरी ग्रंथरुपातून डिजिटल रूपात होत असेल तरी माहितीचे महत्व हे कमी होत नाही. यामुळे आज प्रत्येकजण माहितीच्या शोधात दिसून येतो. 


या ग्रंथालय ब्लॉगच्या माध्यमातून आपणास जास्तीत जास्त माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो 
. तरी आपल्या सर्व गुजनांना आणखीन अधिक माहिती हवी असेल तर खालील ई-मेल आयडी वर आपले माहितीविषयक समस्या पाठवाव्यात.

acscdlibrary20@gmail.com  
librarian.acsckilledharur@gmail.com 


आपल्या सारख्या वाचकरूपी गुरुजनांना गुरु पौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा !! 

                                                                            - ग्रंथपाल

ससदरील ब्लॉगच्या माध्यमातून काही निवडक ब्लॉगद्वारे संत महापुरुष्यांच्या विचारांचा तसेच संशोधकांसाठी उपयुक्त निवडक ब्लॉगचा उहापोह करण्यात आला आहे.

 

महात्मा गौतम बुद्ध - निवडक माहिती स्त्रोत 

छत्रपती शिवाजी महाराज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

संत गाडगेबाबा

जागतिक महिला दिन - निवडक माहिती स्त्रोत 

भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम


संशोधकांसाठी

संशोधकांसाठी - Top 3 Networking Sites

NDLI - एक क्लिक वर वाचा हजारो ई-माहितीसाधने

महाविद्यालयीन वाचकांसाठी उपयुक्त अशी निवडक संकेतस्थळे (websites)

INFLIBNET - संशोधकासाठी संजीवनी (निवडक ई - माहिती स्त्रोत) 

संशोधकासाठी उपयुक्त निवडक ई - माहिती स्त्रोत 

SWAYAM च्या माध्यमातून करता येतात Online Courses






Wednesday, July 14, 2021

संशोधकांसाठी - Top 3 Research Networking Sites





सध्याचे जग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. ICT मुळे सर्व जगात माहितीचे जाळे नेटवर्किंग च्या माध्यमातून निर्मान झाले आहे. या माहितीच्या जाळ्यातून नेमकी संशोधनासाठी उपयुक्त माहिती संशोधकास मिळावी जेणेकरून संशोधकांचा वेळ वाचला जाईल व जगातील प्रसिद्ध संशोधनाचं लाभ घेता येईल.  या हेतूने सदरील ब्लॉग तयार करण्यात आला आहे. 


1.  Academia. edu (https://www.academia.edu/)

Academia.edu is an American for-profit social networking website for academics. It began as a free and open repository of academic journal articles and registered academia.edu domain name when this was not limited to educational institutions. The site was launched in September 2008. 
(Reference-Wikipedia )

 सदरील नेटवर्किंग वर आपणास उपयुक्त अश्या संशोधनावर आधारित जगभरातील संशोधन आपणास पाहता येते. हि एक संशोधनावर आधारित social networking  site  असून एक संशोधक दुसऱ्या संशोधकाशी प्रश्न इवचारू शकतो तसेच एकाच संशोधन विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी सदरील  साईट हि अतिशय उपयुक्त आहे. संशोधक आपले संशोधन या  साईट वर प्रकाशित करतात. संशोधकाला आपले संशोधन किती वाचकांनी कॊणत्या ठिकाणातून वाचले आहे हे समजते तसेच संशोधकांसाठी आवश्यक Impact Factor हि उपलब्ध होते त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या social networking site चा वापर वाढत आहे.

Create Academia.edu Account 2018 | Academia Account Sign Up Free


What is Academia.edu | How to add Research Paper in Academia.edu 





2.  Research Gate (https://www.researchgate.net/)

ResearchGate is a European commercial social networking site for scientists and researchers to share papers, ask and answer questions, and find collaborators.(Reference-Wikipedia )                    

Research Gate हे संशोधक व शास्त्रज्ञाचा संशोधनासंबंधीचे Network  आहे. संशोधक सदरील website वर आपले संशोधन लेख , प्रकल्प व त्यांचे संशोधनासंबंधीचे अनुभव Share करतात. जगात आपल्या संशोधनाशी निगडित अद्ययावत माहिती Research Gate  माध्यमातून मिळते. तसेच संशोधकांना job opportunity संबधीची माहितीही या पोर्टल वर उपलब्ध आहे. यामध्ये संशोधनासंबंधीचे   Citations, Research Interest, Recommendations, Reads पाहायला मिळतात. 

How to Create Researchgate Account without Institutional Email
 




Research Gate: How to Add Articles To Research Gate? 





3.  Google Scholar (https://scholar.google.com/)

Google Scholar is a freely accessible web search engine that indexes the full text or metadata of scholarly literature across an array of publishing formats and disciplines  (Reference-Wikipedia ) 


Google Scholar हे बहुतेक संशोधकांना माहिती असणारं Search Engine आहे. यामध्ये Gmail  चा वापर करून संशोधक आपले संशोधन कार्य सर्व जगासमोर मांडू शकतो तसेच जगातील प्रसिद्ध संशोधन लेख एका क्लिक वर पाहू शकतो. संशोधक आपले online उपलब्ध असलेले संशोधन लेख यामध्ये add करू शकतो व Manually  पण संशोधन लेख add करण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. Google Scholar  हे संशोधकांचा H -index दर्शिवते त्यामुळे हे अत्यंत लोकप्रिय Search Engine आहे. Scholarly  Research Article शोधण्यासाठी संशोधक सदरील पोर्टल चा वापर करतात.   

How to Create and Use Google Scholar Profile for research findings


How to use Google Scholar to find Research Paper




कृपया संशोधकांना सदरील  Networking  Site वापरासंदर्भात समस्या आल्यास खालील ई-मेल वर त्या पाठवावीत :

1. acscdlibrary20@gmail.com 
2. librarian.acsckilledharur@gmail.com



Wednesday, July 7, 2021

NDLI - एक क्लिक वर वाचा हजारो ई-माहितीसाधने

 

(Reference - https://in.linkedin.com/company/ndlindia)

    सध्याचे युग हे इंटरनेट काओ युग म्हणून संबोधले जाते. आपणास हवी असलेली माहिती आपण इंटरनेटच्या मध्यतमातून एका क्लिक मध्ये काही सेकांदामध्ये पाहू शकतो ती डाउनलोड करून जातं करून ठेऊ शकतो. यासाठी वाचकांना आवश्यकता असते ती म्हणजे योग्य अश्या माहितीदालनाची. NDLI हे एक माहिती प्रतिप्राप्तीचे योग्य दालन होय. NDLI चा  Long-form आहे National Digital Library of India. NDLI हा Ministry of Education, Government of India अंतर्गत प्रकल्प असून ही एक Digital Repository आहे.सदरील प्रकल्पाचे कामकाज  IIT, Khargpur संस्थेअंतर्गत पाहिले जाते. सदरील प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा शैक्षणिक व संशोधनासाठी उपयुक्त अशी  ई - माहितीसाधने  मोफत स्वरूपात वाचकांना उपलब्ध करुण देणो हा आहे. 
    विद्यार्थी, संशोधक, वाचकांनी सध्याच्या कोरोनाच्या महामारीत घरी बसून सदरील माहिती साधने वाचू शकतात त्यामुळे वाचकांनी NDLI चा या संकेतस्थळावर जाऊन ई - माहितीसाधनाचा उपभोग घेण्यासाठी हा ब्लॉग पोस्ट निर्मित केला आहे.

Home Page - https://ndl.iitkgp.ac.in/

आपणास होमपेजवर Search option दिसेल त्यावर क्लिक करून माहिती शोधता येते. कोरोना महामारीच्या काळात NDLI ने COVID-19 RESEARCH REPOSITORY ची सुविधा उपलब्ध केली आहे. कोरोना काळात वाचकांना घरी बसून सदरील इ - वाचनासाहित्याचा लाभ घेता येतो. होमपेजच्या डाव्या बाजूस Browse (माहितिचे वर्गीकरण ) व उजव्या बाजूस Login (NDLI वर लॉगिन होण्यासाठी)   हे  पोर्टल दिले आहे. 



NDLI App 

Go To on Mobile Play store & download NDLI App




Browse 

माहितीशोध प्रक्रियेत माहिती हि त्याचा स्वरूपानुसार ,विषयानुसार, माहितीसाधनानुसार तसेच Learning  Resources नुसार शोधण्यासाठी मदत होते .




Subject

विषयानुसार आपणास माहीतच शोध घेता येतो


Register (Fill up all the mandatory information)

यामध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. माहिती पूर्ण  भरल्यानंतर आपणास ई-मेल व पासवर्ड save करून ठेवावा. जेणेकरून NDLI लॉगिन करतेवेळी सदरील ई-मेल व पासवर्ड चा वापर करता येईल. 




Login (Login on Email ID & Password)




Search Key - (Ex. India, Maharashtra)





Access Restriction 

माहितीशोध प्रक्रियेत माहितीचे स्वरूप हे चार रंगात दर्शिवले आहे. उदा. हिरव्या रंग चिन्हांकनतानील माहिती  हि मोफत स्वरूपात पूर्णतः उपलब्ध आहे, लाल रंग चिन्हांकनतानील माहिती मिळवण्यासाठी तो माहिती Source Subscribe करणे गरजेचे असते, केसरी रंगातील माहिती हि थोडक्या स्वरूपात उपलब्ध असून अधिक माहितीसाठी प्राथमिक माहितीसाधनाची आवश्यकता असते. तसेच Limited व NDLI या दोनही चिन्हांकन द्वारे आपणास नेमकी माहिती शोधण्यास मदत होते. 




Author

Search on Exact Author 



Subject Category
Search on related subject 




Educational Level

Level of educational database



File Format

Choose desirable file format from various format



Language

Choose Language from 11 languages 




Learning Resources

To give preference of learning resource 




Source

Creator of Information

 वाचकांना NDLI वापरासंदर्भात काही समस्या येत असतील तर खालील ई-मेल वर संपर्क साधावा 

1. acscdlibrary20@gmail.com 
2. librarian.acsckilledharur@gmail.com


You Tube Videos for additional Information