(Reference - https://tinyurl.com/yzk3p3hc )
गुरू गोविन्द दोऊ खड़े, काके लागूं पांय।
बलिहारी गुरू अपने गोविन्द दियो बताय।।
- संत कबीरदास
गुरू पौर्णिमा
कबीर च्या वरील पंक्तीनुसार गुरुजन हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूंना अतिशय महत्व आहे. गुरूकडून आपण प्रेरणा, मार्गदर्शन घेत असतोच पण त्याप्रमाणे आचरणसुद्धा आपल्या वास्तविक जीवनामध्ये करीत असतो. एखाद्या गोष्टीचा संदर्भ जोडत असताना आपल्या डोळ्यासमोर आपले गुरु उभे राहत असतात. गुरु हि सर्वात मोठी शिदोरी आपण आपल्यासोबत नेहमी बाळगत असतो तसेच ज्ञान रूपात त्याचा थोडा थोडा विसर्ग हि करत असतोच.
आजचा दिवस आपण आपल्या गुरुजनांना शुभेच्छा देऊन साजरा करीत असतो. आपल्या आयुष्यात लहानपणापासूनच अनेक गुरूंचा संपर्क येत असतो पण काही ठराविक गुरूच आपल्या विस्मरणात असतात . गुरूंचे अनेक स्वरूप आपणास पाहावयास मिळतात पण माज्या मते ग्रंथसारखा मोठा गुरु या जगात दुसरा कोणताही नाही.
ग्रंथातून आपण माहिती, ज्ञान हे मिळवतोच तसेच ग्रंथ हे वाचकांच्या करमणुकीचे साधन आहे. माहितीची निर्मिती व माहितीचे प्रसारण हे ग्रंथातूनच होते. आज आपण माहिती व तंत्रज्ञाच्या युगात सर्वजण एका क्लीक वर एकत्र येत आहोत. या माहितीतंत्रज्ञांच्या युगात ग्रंथाचे रूपांतर हे इंटरनेट प्रमुखतः Google सारख्या search engine मध्ये झाले आहे. माहितीचे स्वरूप जरी ग्रंथरुपातून डिजिटल रूपात होत असेल तरी माहितीचे महत्व हे कमी होत नाही. यामुळे आज प्रत्येकजण माहितीच्या शोधात दिसून येतो.
. तरी आपल्या सर्व गुजनांना आणखीन अधिक माहिती हवी असेल तर खालील ई-मेल आयडी वर आपले माहितीविषयक समस्या पाठवाव्यात.
librarian.acsckilledharur@gmail.com
- ग्रंथपाल
ससदरील ब्लॉगच्या माध्यमातून काही निवडक ब्लॉगद्वारे संत महापुरुष्यांच्या विचारांचा तसेच संशोधकांसाठी उपयुक्त निवडक ब्लॉगचा उहापोह करण्यात आला आहे.
महात्मा गौतम बुद्ध - निवडक माहिती स्त्रोत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जागतिक महिला दिन - निवडक माहिती स्त्रोत
भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम
संशोधकांसाठी
संशोधकांसाठी - Top 3 Networking Sites
NDLI - एक क्लिक वर वाचा हजारो ई-माहितीसाधने
महाविद्यालयीन वाचकांसाठी उपयुक्त अशी निवडक संकेतस्थळे (websites)
INFLIBNET - संशोधकासाठी संजीवनी (निवडक ई - माहिती स्त्रोत)
संशोधकासाठी उपयुक्त निवडक ई - माहिती स्त्रोत
SWAYAM च्या माध्यमातून करता येतात Online Courses
Excellent
ReplyDeleteVery good!
ReplyDelete